व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Rashi Bhavishya योगिनी एकादशीचा ‘या’ राशींना होईल फायदा; वाचा तुमचं राशिभविष्य

By Rohit K

Published on:

2nd July Rashi Bhavishya : नमस्कार मंडळी आज 2 जुलै 2024 वार मंगळवार रोजी  आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी आहे. आज राहू काळ दुपारी 03 वाजल्यापासून सायंकाळी चा 4 वाजून 30 मिनिटापर्यंत राहणार आहे.

ग्रहांच्या स्थितीनुसार आजच्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. आज, मंगळवार, 2 जुलै रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला योगिनी एकादशीचं व्रत पाळलं जातं. योगिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि कृतिका नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ, कन्या, मकर, कुंभ, मिन या पाच राशीतील लोकांसाठी आज शुभ दिवस..

वृषभ रास (Taurus)

या राशीसाठी आजचा दिवस खूप उपयोगी ठरेल.  आज वृषभ राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल, वाढत्या आर्थिक समस्यांपासूनही आराम मिळेल. छोटा मोठा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करायचा असेल तर उत्तम यामध्ये चांगले योगदान मिळेल आणि भरभराटी लाभेल.. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी सुख समाधान लाभेल वरिष्ठांकडून मान मिळण्याची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना चांगला नफा मिळून त्यांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस येतील..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

मीन रास (Pisces)

मीन राशि साठी योगिनी एकादशीचा दिवस फलदायी ठरणार असून या लोकांनी हार न मानता आपले प्रयत्न सतत चालू ठेवावे फलप्राप्तीची निश्चित अपेक्षा त्यांच्या मेहनतीला यश लागेल आणि आयुष्यात भरभराटी होईल…  व्यवसायात तेजी येईल, ज्यामुळे आर्थिक लाभाचे सर्व मार्ग खुले होतील आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात मित्रांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे अडचणी कमी होतील.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल. मकर राशीतील लोकांना नवीन आव्हानाला समोर जावे लागेल. या राशीतील लोकांना जमीन प्लॉट घर या ठिकाणी गुंतवणूक करायची असल्यास निश्चितच फायदा होईल या ठिकाणी गुंतवणूक केल्यास  फायदा.. राशीचे लोक आज प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास तयार राहतील आणि सर्व कामं धैर्याने पूर्ण करतील.  त्याच वेळी, आज व्यावसायिक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देतील आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ रास (Aquarius)Rashi Bhavishya

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळाल्याने ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील. आज तुमची प्रतिकारशक्ती आणि शारीरिक आरोग्य उत्कृष्ट असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात.

कन्या:- आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल. Rashi Bhavishya

Free Gas Cylinder ‘या’ महिलांना मिळणार वर्षाला 03 मोफत गॅस सिलेंडर.. पहा तुम्हाला मिळणार का..?

तूळ:- कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

वृश्चिक:- काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

धनू:- गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील..

मेष:- मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

मिथुन:- सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.Rashi Bhavishya

कर्क:- विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:- आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

Today Rashi Bhavishya in marathi
Today Rashi Bhavishya in marathi

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews