Thane Thief News||ठाण्यात 17 लाखाचे दागिने जप्त, घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक
Thane Thief News:सांगली: मिरजेतील कृष्णाघाट रस्त्यावर चोरीचे सोने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली. पोलीसांनी त्याच्याकडून १७ लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपीने मिरजेसह तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
आणखी वाचा:iPhone Container viral video समुद्रात आयफोनचा कंटेनर झाला पलटी; आयफोन लुटण्यासाठी तुंबळ गर्दी..
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली होती की, कृष्णाघाट रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली एक संशयास्पद तरुण चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार आहे. पोलीसांनी परिसरात सापळा लावून निगराणी केली. यावेळी, पुलाखाली थांबलेल्या इसमाच्या अंगझडतीत १७ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सापडले.
अमित राकेश पंचम (वय ३० वर्षे, सध्या रा. वानलेसवाडी, सांगली; मुळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याने सांगितले की, हे सोन्या-चांदीचे दागिने मिरज आणि नौपाडा (ठाणे) येथे घरफोडी करून चोरी केले होते.