New Licence Rules 2024 || नवीन लायसन्स नियम 2024: 1 जूनपासून नियम बदलणार, आरटीओला जाण्याची गरज नाही
गोंदिया, दि. २३:अनेकांना लायसन्स काढण्याची प्रक्रिया फारच किचकट वाटते, म्हणूनच ते काढले जात नाही. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.वाहन चालवताना सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. हे कागदपत्र जवळ बाळगणे अत्यावश्यक असते, अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. नवीन लायसन्स नियम 2024 अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नवीन नियमांमध्ये बदल
1 जून 2024 पासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या बदलांची घोषणा केली आहे. नवीन नियमानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आरटीओला जाण्याची गरज नाही.
नवे नियम काय आहेत?
नवीन नियमानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) चाचणी घेण्याचे बंधन रद्द केले जाणार आहे. लायसन्स मिळवण्यासाठी व्यक्तीला आता आरटीओच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. त्याऐवजी, इच्छुक व्यक्ती त्यांच्या जवळच्या अधिकृत ड्रायव्हिंग केंद्रावर जाऊन टेस्ट देऊ शकतील.
वाहन चालवताना वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास मोठा दंड होणार आहे. दंडाची रक्कम 1,000 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच, जर अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेला तर पालकांवर थेट कारवाई होईल आणि त्यांना 25,000 रुपयांचा दंड होईल. अशा प्रकरणांमध्ये वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केले जाईल.
शुल्क किती लागणार?
– लर्निंग लायसन्स: 150 रुपये
– लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क: 50 रुपये
– ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क: 300 रुपये
– ड्रायव्हिंग लायसन्स: 200 रुपये
– लायसन्स नूतनीकरण: 200 रुपये
– दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स: 500 रुपये
प्रदूषण करणारी जुनी वाहने बाद
प्रदूषण करणारे तब्बल नऊ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणास मदत होईल.
कठोर दंड आणि नवीन नियम
– अल्पवयीन वाहनचालक पकडल्यास 25,000 रुपयांचा दंड आणि 25 व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही.
– वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.
– वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत, ज्यामुळे लायसन्स अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे.
सुलभ अर्ज प्रक्रिया
लायसन्सची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार लागणारी कागदपत्रे कमी करण्यात आली आहेत, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे
नवीन लायसन्स नियम 2024 च्या या बदलांमुळे लायसन्स काढणे अधिक सोपे होईल, आणि वाहतूक नियमांचे पालनही अधिक कठोर होणार आहे.