व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Salman Khan Viral News: सलमान खानला मारण्याचा कट उधळला: 70 शूटर्स तयारीत, एका कॉलने पोलिसांनी गुंता सोडवला!

By Rohit K

Published on:

Salman Khan Viral News: सलमान खानला मारण्याचा कट उधळला: 70 शूटर्स तयारीत, एका कॉलने पोलिसांनी गुंता सोडवला!

 

Salman Khan Viral News:मुंबईत सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. आता, मुंबई पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर झालेले बोलणे पोलिसांच्या हाती लागले आहे.

सलमान खानवर हल्ल्याचा कट उधळला

सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून काल आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या चौकशीतून मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानच्या विरोधात आणखी एक नवा कट रचला होता, परंतु पोलिसांनी तो कट उधळण्यात मोठे यश मिळवले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

मुंबई पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर झालेले बोलणे पोलिसांना मिळाले आहे. हा व्हिडीओ कॉल एक महत्त्वाचा पुरावा आहे. त्या व्हिडीओ कॉलमध्ये अजय कश्यप आणि त्याच्या साथीदारात काय बोलणं झालं त्याचे डिटेल्स समोर आले आहेत. अजय कश्यप पोलिसांच्या त्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे ज्याला पोलिसांनी एका प्लानद्वारे बिश्नोई गँगमध्ये दाखल केले होते.

व्हिडीओ कॉलचा तपशील

अजय कश्यप आणि समोरील व्यक्तीमध्ये झालेल्या व्हिडीओ कॉलमध्ये पुढील संवाद झाला:

अजय कश्यप: मूसेवाला केसमध्ये थारवर चढून ज्याने गोळी मारली नो … तो तोच आहे.

समोरील व्यक्ती: मूसेवालाला लागलेली पहिली गोळी बहुधा पिस्तुलातून सुटली होती ना?

अजय कश्यप: जिगाना पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली.

समोरील व्यक्ती: मला काहीतरी सांग ना भाऊ.. काय चाललंय सलमान खानचं?

अजय कश्यप: ते नेटवर्कही (व्यक्ती) मुंबईत पोहोचलं आहे.

समोरील व्यक्ती: म्हणजे त्याचा गेम होणार आहे.

अजय कश्यप: मुंबई, पुण्यात नव्हे.. तो पनवेलला बसला आहे. इथून पुण्याचा तासाभराचा प्रवास आहे. काय फरक पडतो? जॉनला कॉल करेल. जॉन गाडी घेऊन येईल, मग आपण इथून निघू. इथून पंजाब नंतर बाघा पोस्टला (जाऊ).

समोरील व्यक्ती: 50 ते 60 लोकंही तिथे असं ऐकलंय

अजय कश्यप: 70 लोकं आहेत. 70 मुलं तयार आहेत आपली.

समोरील व्यक्ती: मला कोणीतरी म्हणालं की तिथे जो आपला माणूस बसलाय तो म्हणतोय की 50 लोकं आहेत, सगळेच शूटर्स आहेत.

अजय कश्यप: 70 मुलं आहेत. आपल्याकडे सर्वात उत्तम शूटर्स आहेत. सगळेच फिल्डींग लावून बसले आहेत. बस, एक गोळी.. आणि त्याची (शिवी) गाडी बुलेटप्रूफ असो किवा नसो… त्याचा (शिवी) किस्साच संपेल.

समोरील व्यक्ती: कोणती बंदूक आहे? M416 आहे का? की सिद्धू मूसेवालावर ज्याने गोळी झाडण्यात आली तीच होती का?

अजय कश्यप: सिद्धू मूसेवाला वर AK 92 वरून गोळी झाडण्यात आली. मी कोणाला व्हिडीओ पाठवत नाही. व्हिडीओ माझ्याकडेच आहे. आम्ही माल बघतो आणि मग डील करतो. दुसऱ्यांना हवा असेल तर मी त्यांनाही देतो. पैसे मी डायरेक्ट माझ्या अकाऊंटमध्ये घेत नाही. पहिले पैसे कॅनडाला पाठवण्यात येतात मग त्यानंतर माझ्या अकाऊंटमध्ये पाठवण्यात येतात.

 आरोपींचा नेमका कट काय?

लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नव्या कटानुसार, 70 ते 80 जण सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. हे सर्व आरोपी सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटकेतील सर्व चारही आरोपी हे थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होते. तसेच या आरोपींनी सलमानवर हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानातून AK-47 मागवली होती. धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वसीम खान उर्फ वसीम चिकना, झिशान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. आरोपींचा सलमान खानवर हल्ला करून कन्याकुमारी मार्गाने श्रीलंकेत पळून जाण्याचा प्लॅन होता. हे चारही आरोपी पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

बघा काय होती story:

आणखी पाहा: बॉलिवूडमध्ये नशीब चमकलं नाही, पोलीस बनून लुबाडलं; महत्वाकांक्षी अभिनेत्याला अटक || Bollywood Actor robbing peoples as posing Actor 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews