व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Land Purchase: जमीन व्यवहाराचा गुंता: वारसांच्या नोंदीआधीच खरेदीचे कागद! 24

By Rohit K

Updated on:

Land Purchase Before Registration

Land Purchase: जमीन व्यवहाराचा गुंता: वारसांच्या नोंदीआधीच खरेदीचे कागद!

गावाची गोष्ट: गुरुनाथ आणि भगवानच्या जमिनीचा संघर्ष
Land Purchase Before Registration
Land Purchase Before Registration By Mh-Live.Com

Land Purchase: गुरुनाथ नावाचा एक शेतकरी आपल्या शेजारील तीन एकर जमीन विकत घेण्याच्या तयारीत होता. त्याचा शेजारी, भगवान नावाचा शेतकरी, त्याला जमीन विकण्यास तयार होता. मात्र, जमिनीचा व्यवहार सुरू असतानाच भगवानला पोटाचा आजार झाला आणि त्याला महिनाभर शहरातील हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्यामुळे गुरुनाथचा जमीन खरेदीचा विचार थोडा मागे पडला.

 

भगवान जेव्हा परत गावात आला, तेव्हा तो अत्यंत अशक्त झाला होता. अशा परिस्थितीत जमीन खरेदीची चर्चा करण्यास गुरुनाथने टाळले. शेजारीच राहणाऱ्या भगवानसाठी त्याने विचार केला की, जेव्हा भगवान पूर्णपणे बरा होईल तेव्हाच व्यवहार करू.Land Purchase

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

भगवानची प्रकृती पुन्हा बिघडली आणि तीन महिन्यांनी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. भगवानच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी त्याच्या मुलांना, विक्रम, विलास आणि दीपक यांना पैशांची गरज होती. त्यानुसार, भगवानचे मुलगे विक्रम, विलास आणि दीपक यांनी रजिस्टर खरेदी खतावर सह्या करून ती जमीन गुरुनाथला विकून टाकली.Land Purchase

 

संपूर्ण व्यवहार एकमेकांतील सामंजस्याने पार पडला होता आणि त्यात कोणताही विसंवाद नव्हता. मात्र, भगवानच्या निधनानंतर गुरुनाथने खरेदीखताची नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठ्याकडे अर्ज दिला तेव्हा एक अडचण उभी राहिली.

 

तलाठ्याने सांगितले की, मूळ सातबारा उताऱ्यावर भगवानचे नाव आहे. पण आता भगवान मयत झाल्यामुळे थेट खरेदीची नोंद करता येणार नाही. त्यासाठी भगवानच्या वारसांची नोंद आधी करावी लागेल. गुरुनाथने त्याला पटवून सांगितले की, भगवानला फक्त तीनच मुलगे आहेत आणि अन्य कोणी वारस नाहीत. तरीसुद्धा तलाठ्याने त्यांचे ऐकले नाही. त्याने वारसांची नोंद होईपर्यंत फेरफार नोंद रद्द केली.Land Purchase

 

या प्रकरणात गुरुनाथने महसूल कोर्टात अपील दाखल केले आणि खरेदीखताच्या फेरफारामध्ये दुरुस्तीची नोंद करण्याचे निर्देश तलाठ्याला देण्याची मागणी केली. अपील दाखल करण्यासाठी गुरुनाथने सुमारे सत्तर हजार रुपये स्टँम्प ड्युटी भरली. पुढील तीन वर्षे गुरुनाथ आणि भगवानचे मुलगे कोर्टात हेलपाटे मारत राहिले, पण काहीही निष्पन्न झाले नाही.Land Purchase

 

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार, सातबारा रेकॉर्डवरील हितसंबंधीत पक्षकारांना फेरफार नोंदीची नोटीस दिली जाते. मात्र, मयत भगवानच्या नावावर नोंद असल्यामुळे नोटीस देता येत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. भगवान जिवंत असतानाच रजिस्टर व्यवहार झाला असल्यामुळे फक्त खरेदी खताची नोंद घ्यावी अशी गुरुनाथची मागणी होती. परंतु सर्कल अधिकाऱ्यांनी तांत्रिक मुद्यावर अडून नोटीस दिली नसल्यामुळे नोंद रद्द केली.

 

दिवाणी न्यायालयात गेल्यामुळे प्रश्न सुटला तर नाहीच, उलट गुरुनाथला प्रचंड मनस्ताप भोगावा लागला. न्यायालयाने खरेदी खत योग्य असल्याचे मान्य केले, पण फेरफार नोंद करून सातबारावर नावे लावावीत असे निकालपत्रात लिहिले नव्हते. Land Purchase

 

या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, जमीन महसूल कायद्यातील नियमांचे पालन न केल्यामुळे व वडिलांच्या वारसांची नोंद होण्यापूर्वीच मुलांनी जमीन विकल्यामुळे गुरुनाथला मनस्ताप झाला. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये कायद्याची पूर्तता करूनच पुढे जावे, हाच धडा यातून शिकायला मिळतो.

🔗 जमीन खरेदी करताना कोणते कागदपत्र असतात आवश्यक जाणून घ्या:

आणखी वाचा: Shetkari Yashogatha 2024: वा रे पठ्या! आंबा विक्रीतून रायचूरच्या शेतकऱ्याची  लाखोंची कमाई ,नोकरी सोडून शेतीचा मार्ग

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews