Free Gas Cylinder नमस्कार मित्रांनो राज्य सरकार सरकारने नुकताच आपला अंतिम अर्थसंकल्प सादर केला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना घरगुती मोफत सिलेंडर देण्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील महिलांना वर्षाकाठी 03 गॅस सिलेंडर मोफत देण्याचे तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत परंतु यासाठी काही पात्रता ठरविणत आली आहे ती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया …ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागून होणार नसून त्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत. या योजनेद्वारे जवळपास राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरंतर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे. महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात. त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं. खर्च वाढल्याने महिलांना पैशांचं नियोजन खूप काटकसरीने करावं लागत असतं.
त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची नुकतीच घोषणा केलेली असून यासाठी अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन असे दोन्ही पद्धतीचे अर्ज राशन दुकानदार यांच्याकडे उपलब्ध होणार असून लवकरच या संबंधित अपडेट येणार आहे..