व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral Suicide Reel: जीव एवढा स्वस्त असतो का?

By Rohit K

Published on:

Viral Suicide Reel

Viral Suicide Reel: जीव एवढा स्वस्त असतो का?

Viral Suicide Reel: पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते, मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. त्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवाला धोका पत्करावा लागतो. अलीकडेच एक धबधब्यावर स्टंट करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Viral Suicide Reel कसे झाले हे?

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपले आयुष्य बदलले आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमवत आहेत. परंतु, व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत ज्यात व्हिडीओ बनवताना जीव गमवावे लागले आहेत.

Viral Suicide Reel प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी

रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट करताना दिसतात. पण काही वेळा याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते, मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. असाच एक स्टंट धबधब्यावर करण्यात आला जो या तरुणीसाठी प्राणघातक ठरला आहे.

Viral Suicide Reel नेमके काय घडले?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

काही लोकांना स्टंटबाजीची फारच हौस असते. संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, ही स्टंटबाजी काही वेळेस त्यांच्या अंगाशी येते. प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. असाच एक प्रकार या तरुणीसोबत घडला आहे.

Viral Suicide Reel धबधब्यावर स्टंटबाजी

या व्हिडीओमध्ये पाहता येते की, एक तरुणी डॅमवर साडी नेसून आली आहे. ती रील करण्यासाठी जीव धोक्यात घालून डॅमच्या मधोमध उभी राहते. यावेळी रीलसाठी स्टंटबाजी करण्याचा मोह तिला आवरत नाही. त्यामुळे ती डॅमच्या मधोमध उभी राहून रील व्हिडीओ शूट करू लागते. दरम्यान, ती पाण्यात वाहून जाते आणि काही क्षणातच गायब होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

पाहा Viral Suicide Reel

 

View this post on Instagram

 

A post shared by Preeti Morya (@preeti.morya.714)

Viral Suicide Reel

Viral Suicide Reel: नुकत्याच्या घटना

नुकत्याच महाराष्ट्रात दोन धक्कादायक घटना घडल्या. एक म्हणजे लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी (३० जून) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटातही एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली.

तरुणाईने अशा धोकादायक स्टंटपासून सावध राहावे. प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालण्याऐवजी सुरक्षित आणि जबाबदार पद्धतीने मनोरंजन करणे आवश्यक आहे. Viral Suicide Reel प्रमाणेच अनेक घटनांनी आपल्याला शिकवले पाहिजे की जीवन अनमोल आहे, आणि त्याची कदर करणे आवश्यक आहे.

आणखी पाहा: Viral Funny Video: बँक कर्मचारी झाले थक्क जेव्हा महिलेने बँकेच्या डिपॉझिट स्लिपवर ‘राशी’ कॉलममध्ये लिहिली स्वत:ची

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews