व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Chanakyaniti: ‘या’ लोकांचा सहवास सोडा मग बघा प्रगती; वाचा चाणक्यनीती!

By Rohit K

Published on:

Chanakyaniti

Chanakyaniti: ‘या’ लोकांचा सहवास सोडा मग बघा प्रगती; वाचा चाणक्यनीती!

Chanakyaniti: आचार्य चाणक्य🔎 हे एक महान तत्त्वज्ञ होते ज्यांनी आपल्या चाणक्यनीतीत यशाची अनेक सूत्रे दिली आहेत. त्यांच्या या धोरणानुसार, जर तुम्ही काही प्रकारच्या लोकांपासून दूर राहिलात तर तुमची प्रगती निश्चितच होईल. चला तर मग पाहूया, कोणते आहेत हे लोक ज्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे.

Chanakyaniti: अनैतिक मार्गाने काम करणारे लोक

चाणक्यनीतीनुसार, अशा लोकांपासून दूर राहावे जे अनैतिक मार्गाने काम करतात. हे लोक स्वतः चुकीची वाट धरतात आणि दुसऱ्यांनाही चुकीच्या मार्गावर नेतात. त्यामुळे तुम्ही आपोआप यशापासून, सन्मार्गापासून दूर जाता. अशा लोकांपासून चार हात लांब राहणे केव्हाही चांगले. हे लोक स्वतःचे भले करत नाहीत आणि दुसऱ्याचे भले होऊ देत नाहीत.

Chanakyaniti:  नकारात्मकता पसरवणारे मित्र

जीवनात यश मिळवण्यासाठी प्रथम अपयशाचा मार्ग चोखाळावा लागतो. प्रत्येकाला अपयश येते, परंतु खचून न जाता उभारी घ्यायला हवी. यासाठी मित्रसुद्धा सकारात्मकता देणारे असावेत. काही लोक अपयशाने खचलेल्या लोकांना आणखीनच नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलतात. अशा मित्रांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

Chanakyaniti: रिकामटेकडे लोक

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, रिकाम्या लोकांपासून दूर राहायला हवे. हे लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि जे काही करू इच्छितात त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचे काम करतात. असे लोक मानसिक तणाव निर्माण करतात आणि त्यांच्या सहवासात राहणे धोकादायक ठरते.

Chanakyaniti:    स्वार्थी लोक

जे लोक स्वार्थासाठी गोड बोलून आपले काम करवून घेतात, अशा लोकांपासून दूर राहा. हे लोक त्यांचे काम झाल्यावर तुमच्याकडे ढुंकून पाहतही नाहीत. तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीव ठेवत नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळे अशा स्वार्थी लोकांपासून सावध राहा.

Chanakyaniti :      मूर्ख आणि विवेकशून्य लोक

जे लोक झालेल्या चुकांमधून शिकतात त्यांना शहाणे म्हणतात, पण जे पुनःपुन्हा त्याच चुका करतात आणि शिकत नाहीत, अशा लोकांपासून दूर राहावे. ते स्वतः मूर्ख बनतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही मूर्ख बनवतात. त्यांच्या सहवासात राहणे तुमच्या प्रगतीला अडथळा ठरू शकते.Chanakyaniti

आचार्य चाणक्य यांच्या या मार्गदर्शनाचे पालन करून तुमच्या जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारच्या लोकांपासून दूर राहून यशस्वी व्हा.

🔗आणखी वाचा:Sadhguru Parenting Advice: मुलांना घडवण्यासाठी पालकांनी या 6 गोष्टी करा सदगुरू यांचा पालकांना सल्ला

Chanakyaniti
Chanakyaniti

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews