व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Shivneri Bus Incident: कॉफीचा कप आणि ८० तास बेशुध्द: शैलेंद्र साठे यांची कहाणी

By Rohit K

Published on:

Shivneri Bus Incident

Shivneri Bus Incident: कॉफीचा कप आणि ८० तास बेशुध्द: शैलेंद्र साठे यांची कहाणी

पुण्यातले व्यावसायिक शैलेंद्र साठे १४ जूनला काही कामानिमित्त पुण्याहून मुंबईला जात होते. तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. धडधाकट असलेले साठे जेव्हा मुंबईला पोहोचले, तेव्हा त्यांची अवस्था एखाद्या मद्यधुंद व्यक्तीसारखी झाली होती. नशेत असल्याचा समज करून घेतलेली शिवनेरी बसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फुटपाथवर एका कचराच्या ढिगाऱ्याजवळ सोडून दिलं.

शैलेंद्र साठे यांना प्रवासादरम्यान अल्कोहोल घेतलेले नव्हते. तरीही, ते स्वतःला उभेही ठेवू शकत नव्हते. त्यांच्यावर काय संकट आले आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती. घरातून कामासाठी निघालेले साठे तब्बल सोळा तास फुटपाथवर पडून होते. त्यांनी अनेकांकडे मदत मागितली, पण कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. दारु पिऊन माणूस पडला असावा, असा समज अनेकांचा झाला.

अशा अवस्थेत साठे तब्बल ८० तास होते. जेव्हा त्यांना पूर्ण शुद्ध आली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कोणीतरी त्यांचं सोनं, पैसे, महागडा फोन आणि घड्याळ सगळं लुटलं होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्याला कारण ठरली होती ती एक कप कॉफी. प्रवासात त्यांनी घेतलेल्या त्या कप कॉफीमध्ये काहीतरी घातक पदार्थ असावा, ज्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मद्यधुंद समजून फुटपाथवर सोडून दिल्यामुळे, शैलेंद्र साठे यांना अजूनही मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे. या घटनेने समाजाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. मदत मागणाऱ्या व्यक्तीच्या स्थितीचा खरा अंदाज घेणे आणि तातडीने योग्य ती मदत पुरवणे हे आपले कर्तव्य आहे, हे विसरू नये.Shivneri Bus Incident

शैलेंद्र साठे यांची ही कहाणी एक धडा म्हणून आपल्यासमोर येते. प्रत्येकाला काळजीपूर्वक वागण्याची आणि गरजूंना मदत करण्याची साक्ष देत, या घटनेने आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे.

पाहा ही न्युज व्हिडियोद्वारे:
 

🔗आणखी पाहा: Waterfall video :- पोहता येत असलेली लोकं सुद्धा वाहून गेली,video पाहा १ मिनिटांत कसं वाढतं धबधब्याचं पाणी

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews