व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mukesh Ambani आणि Gautam Adani: मुकेश अंबानी पुन्हा आघाडीवर, गौतम अदानी यांना धक्का, या यादीत मोठे बदल

By Rohit K

Published on:

Mukesh Ambani

Mukesh Ambani आणि Gautam Adani: मुकेश अंबानी पुन्हा आघाडीवर, गौतम अदानी यांना धक्का, या यादीत मोठे बदल

Mukesh Ambani आणि Gautam Adani: हुरुन इंडियाच्या यादीत मुकेश अंबानींची आघाडी कायम, गौतम अदानी यांचे नाव गायब

Mukesh Ambani आणि Gautam Adani: भारतातील श्रीमंत उद्योजकांची यादी म्हटली की, पहिल्यांदा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यानंतर गौतम अदानी यांची नावे हमखास समोर येतात. फोर्ब्स असो किंवा ब्लूमबर्ग, या सर्वच जागतिक यादींमध्ये हे दोघे दिग्गज उद्योजक अग्रक्रमावर असतात. मात्र, हुरुन इंडियाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा अव्वल स्थानी आहेत, तर गौतम अदानी यांचे नाव मात्र यादीतून गायब झाले आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बार्कलेज प्रायव्हेट क्लाईंट्स हुरुन इंडिया: अंबानी कुटुंब सर्वात मौल्यवान

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

बार्कलेज प्रायव्हेट क्लाईंट्स हुरुन इंडियाने जाहीर केलेल्या सर्वात मौल्यवान व्यावसायिक कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंबाने 25.75 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब ठरले आहे. मात्र, या यादीत गौतम अदानी यांच्या कुटुंबाला स्थान मिळाले नाही. त्याऐवजी, बजाज कुटुंब 7.13 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आणखी पाहा :E Panchanama payment Status: 2024अतिवृष्टी, दुष्काळी अनुदान स्टेटस चेक करा!

अदानी कुटुंब यादीतून बाहेर, परंतु दुसऱ्या पिढीच्या नेतृत्वात आघाडीवर

गौतम अदानी यांचे कुटुंब देशातील सर्वात श्रीमंतांमध्ये असले तरी, हुरुन इंडियाच्या या यादीत त्यांना मुख्य स्थान देण्यात आले नाही. अदानी कुटुंबाचे एकूण व्यावसायिक मूल्य 15.44 लाख कोटी रुपये आहे, पण या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. तथापि, दुसऱ्या पिढीच्या नेतृत्वाखाली असलेल्या कुटुंबांच्या यादीत अदानी कुटुंब आघाडीवर आहे. या यादीत सीरम इन्स्टिट्यूटचे पुनावाला कुटुंब 2.37 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हुरुन इंडियाच्या यादीत संपत्तीतील वाढ आणि उद्योजकांचे योगदान

हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनेद यांच्या मते, गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन चतुर्थांश कुटुंबांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या आर्थिक स्थिरतेमध्ये आणि वाढीमध्ये या कुटुंबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतात परदेशी गुंतवणूक सातत्याने वाढत असून, याचा फायदा देशातील टॉप बिझनेस कुटुंबांना होत आहे.Mukesh Ambani

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews