Tata Curvv EV: टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक SUV, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Tata Curvv EV Price And Features: 585 किमीची जबरदस्त रेंज
Tata Curvv EV दोन बॅटरी पर्यायांसह येते: 45 kWh आणि 55 kWh. लाँग रेंज व्हेरियंटमध्ये एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही SUV 585 किमीची ARAI रेंज देते, तर 45 kWh बॅटरीसह ती 502 किमी पर्यंत चालते. 70kW चार्जरच्या मदतीने, केवळ 40 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येतो, आणि 15 मिनिटांत तुम्हाला 150 किमीपर्यंतची रेंज मिळते.
Tata Curvv EV Price And Features: शानदार डिझाइन आणि फीचर्स
ही SUV अनेक आकर्षक फीचर्ससह सज्ज आहे. 18 इंच व्हिल्स, 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 450 मिमी वॉटर वेडिंग क्षमता, फ्लश डोअर हँडल, 500 लिटर बूट स्पेस, आणि कनेक्ट केलेले ॲप्स यांसारखी वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत. याशिवाय, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट, स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्ससारखी अद्ययावत फीचर्सही या गाडीत आहेत.
Tata Curvv EV Price And Features: अत्याधुनिक सुरक्षा
सुरक्षिततेच्या बाबतीत, Tata Curvv EV खूपच सुरक्षित आहे. यामध्ये सहा एअरबॅग्ज, थ्री पॉइंट ईएलआर सीटबेल्ट, सीटबेल्ट अँकर प्री-टेन्शनर, फोर्टिफाइड बॉडी स्ट्रक्चर, आयसोफिक्स, आणि 20 लेव्हल-2 ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV मध्ये ESP, EPB, 360 सराउंड व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर अशा सर्वात उत्तम सेफ्टी फीचर्स आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित बनतो.
Tata Curvv EV Price And Features: किंमत आणि व्हेरियंट
Tata Curvv EV ची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या सात व्हेरियंटमध्ये बदलू शकते. या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे. बुकिंग 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, आणि टेस्ट ड्राइव्ह 14 ऑगस्टपासून उपलब्ध असेल. टाटाच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट्सची किंमत 2 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
Tata Curv EV Price And Features: विविध व्हेरियंट
Tata Curv EV ला 5 ट्रिममध्ये 7 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. विविध व्हेरियंट्सची एक्स-शोरूम किंमत खालीलप्रमाणे आहे:
- Tata Curv EV Creative 45 kWh – ₹17.49 लाख
- Tata Curv EV Complete 45 kWh – ₹18.49 लाख
- Tata Curv EV Accomplished Plus S 45 kWh – ₹19.29 लाख
- Tata Curv EV Complete 55 kWh – ₹19.25 लाख
- Tata Curv EV Accomplished Plus S 55 kWh – ₹19.99 लाख
- Tata Curv EV Empowered Plus 55 kWh – ₹21.25 लाख
- Tata Curv EV Empowered Plus A – ₹21.99 लाख
भारतीय बाजारपेठेत Tata Curv EV चा मुकाबला Citroen Basalt, Mahindra XUV 400, आणि MG ZS EV सारख्या SUV सोबत होणार आहे. या नव्या इलेक्ट्रिक SUV ने बाजारात धमाकेदार प्रवेश केला आहे, आणि ग्राहकांना निश्चितच तिला पसंती मिळेल.
🔗आणखी पाहा: Cars For Family: भरपूर स्पेस, भरपूर मायलेज, 5.32 लाखांची `ही` आहे 7 सीटर बेस्ट फॅमिली कार..