Kolhapur Viral Video: “कोल्हापूरच्या आजीचा नाद नाय” भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला; VIDEO पाहून अवाक् व्हाल
Kolhapur Viral Video: भाजी विकून कोटींचा बंगला
कोल्हापूरच्या शेवंती यादव आज्जी, गेल्या ४० वर्षांपासून भाजीपाला विकत आहेत. त्यांच्या अथक परिश्रम आणि चतुर नियोजनामुळे त्यांनी लाखोंची कमाई केली आहे. एका तरुणाने त्या भाजी विकताना त्यांच्याशी गप्पा मारल्यावर, या आज्जींनी भाजी विकून १४ खोल्यांचा एक कोटीचा बंगला बांधल्याचं उघड झालं.
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
Kolhapur Viral Video: सेंद्रिय शेतीचा जोर
भाजीपाला विक्रीतून इतकं मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या शेवंती यादव आज्जींनी शेतीमध्ये रसायनांचा वापर न करता फक्त शेणखताचा वापर केला आहे. सेंद्रिय भाजीपाला खाण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि रसायनांच्या वापरामुळे वाढणाऱ्या आजारांवरही प्रकाश टाकला.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली, “जगात भारी आम्ही कोल्हापुरी. कोल्हापूरच्या आज्जीचा नाद नाय”, अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ actor_amoldesai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.