iPhone Viral Video
: हट्टाच्या जोरावर मुलाने मिळवला आयफोन, आईची विकते फुल.. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी संतापले
iPhone Viral Video: मुलाच्या हट्टाची कहाणी
या व्हिडिओमध्ये दिसतं की, एका फुलविक्रेत्या आईचा मुलगा आयफोनसाठी हट्ट धरतो. आईने महागड्या आयफोनसाठी नकार दिल्यावर, मुलाने उपोषण सुरू केलं. तीन दिवस काहीही न खाल्ल्यामुळे अखेर आईला मुलाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. शेवटी, त्या आईने पैसे जमवून मुलाला आयफोन घेऊन दिला.
iPhone Viral Video: व्हिडिओत दिसणारी घटना
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, मुलगा एका मोबाईल दुकानात आयफोन खरेदी करण्यासाठी हातात पैसे घेऊन उभा आहे. त्याला विचारलं जातं, ‘कोणता फोन घेतो आहेस?’ तेव्हा तो उत्तर देतो की, ‘मी आयफोन घेतो आहे. माझ्या आईने सर्व पैसे दिले आहेत.’ यानंतर आई सांगते की, “मी मंदिराबाहेर फुलं विकते. माझ्या मुलाने तीन दिवस काहीही खाल्लं नाही, म्हणून मी त्याला आयफोन घेऊन दिला.”
iPhone Viral Video: नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या मुलाच्या कृत्याची टीका केली आहे, तर काहींनी मुलाचा हट्ट हा काळानुसार बदललेला संस्कार म्हणून व्यक्त केला आहे. एक युजर म्हणतो, “जर त्या पैशांचा वापर चांगल्या कामासाठी झाला असता, तर कदाचित तुमचं आणि तुमच्या आईचं आयुष्य अधिक चांगलं झालं असतं.”
पाहा ही न्युज: Nashik News: नाशिक बंद दरम्यान तणावाची स्थिती, दुकाने बंद करण्यावरून दोन गटांमध्ये संघर्ष!
iPhone Viral Video: काळानुसार बदलणारी पिढी
या घटनेतून स्पष्ट होतं की, आजच्या काळात मुलंही बदलत चालली आहेत. “वक्त वक्त की बात है, जमाने के साथ बॅच्चेभी बदलते जा रहे हैं” अशी कमेंट काहींनी दिली आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि ट्रेंडच्या नादात आजची पिढी वेगवेगळ्या गोष्टींचा हट्ट धरत आहे, हे या व्हिडिओतून दिसून येतं.
सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुलाच्या हट्टामुळे आईची धडपड आणि मेहनत दुर्लक्षित राहिली असल्याचं नेटकरी बोलून दाखवत आहेत.
पाहा व्हिडिओ:
This Guy stopped eating food and was demanding iPhone from her mother, His mother finally relented and gave him money to buy iPhone. She sells flowers outside a mandir.
pic.twitter.com/CS59FAS4Z4— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 18, 2024