व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Dahi-handi viral video: तीन थरांचा मानवी मनोरा उभारून गोविंदांनी सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वधाचा  प्रसंग – व्हिडिओ व्हायरल 

By Rohit K

Published on:

Dahi-handi viral video

Dahi-handi viral video: तीन थरांचा मानवी मनोरा उभारून गोविंदांनी सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वधाचा  प्रसंग – व्हिडिओ व्हायरल 

Dahi-handi viral video:तीन थरांचा मानवी मनोरा

Dahi-handi viral video कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालानिमित्त दहीहंडी उत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. विशेषतः मुंबई आणि पुण्यात, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं मानवी मनोरे उभारून स्पर्धा करतात. याच दरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात गोविंदांनी तीन थरांचा मानवी मनोरा उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला तो प्रसंग सादर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आला आहे.

आणखी पाहा: भारतातील सर्वात मोठी दहीहंडी पहा लाईव्ह

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

गोविंदांनी उभारला तीन थरांचा मनोरा

Dahi-handi viral video या व्हिडिओमध्ये, गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून तीन थरांचा मानवी मनोरा उभारला आहे. दुसऱ्या थरावर उभ्या असलेल्या गोविंदांनी फळीवर उभं राहण्याकरिता हातात मोठी फळी पकडली आहे, जिथे तिसऱ्या थरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘अफझल खान’ यांच्या वेशभूषेतले कलाकार उभे आहेत. या उंचावर उभ्या राहून त्यांनी अफझल खानाच्या वधाचा प्रसंग सादर केला आहे. व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीवर अफझल खानाच्या वधाचा पोवाडा ऐकायला मिळत आहे. हा प्रसंग पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ

इंस्टाग्रामवर ‘maharashtrian_admin’ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, “दहीहंडी उत्सवात असं काही बघितल्यावर मान गर्वाने उंचावते. आपला इतिहास आपला स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले, “हे मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथक आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “अंगावर काटा आला दादा!”

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी गोविंदांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

पाहा हा व्हिडिओ : 

Dahi-handi viral video
Dahi-handi viral video

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews