व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कास पठाराचा हंगाम सुरु: निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण || Kas Pathar

By Rohit K

Published on:

Crop loss

Kas Pathar: कास पठाराचा हंगाम सुरु: निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण

Kas Pathar: कास पठार हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध 

साताऱ्याच्या पश्चिमेकडे सुमारे 22 किमी अंतरावर वसलेले कास पठार Kas Pathar हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत विविध रंगीबेरंगी रानफुलांचा निसर्ग फुलतो. फुलपाखरांची अनेक प्रजाती येथे आढळतात. यंदाच्या पावसाळ्याच्या विलंबामुळे सप्टेंबरमध्येच हंगामाला सुरुवात झाली आहे.

कास पठार Kas Pathar हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. Kas Pathar येथे सापडणाऱ्या दुर्मिळ फुलांच्या प्रजातींमुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. नीलीमा, अबोली, दीपकांडी, सोनकी, तेरडा यांसारख्या शंभर ते दीडशे जातींची फुले या ठिकाणी पाहायला मिळतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आणखी पाहा : वंदे भारत ट्रेनच इंजिन फेल, मालगाडीचे इंजिन वापरुन गाडी नेली , पाहा व्हिडिओ || Vande-Bharat Train

पर्यटकांसाठी शुल्क आणि सोयी-सुविधा

कास पठारावर Kas Pathar पर्यटन करण्यासाठी पुरुषांसाठी प्रवेश शुल्क 150 रुपये असून, विद्यार्थ्यांसाठी फक्त 40 रुपये शुल्क आहे. येथील पर्यटकांसाठी पार्किंगपासून पठारापर्यंत वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.

निसर्गाच्या कुशीत सावधगिरी बाळगणे आवश्यक

Kas Pathar पठारावरचा निसर्ग हा अत्यंत मोहक असला तरी, येथे प्रचंड धुके आणि गारवा असल्यामुळे स्वेटरचा वापर आवश्यक आहे. सतत धुक्याने दरीचा भाग दिसत नसतो. हे सदा हरित जंगल असल्यामुळे येथे बिबटे आणि अस्वलांसारखे हिंस्र प्राणीही अधूनमधून आढळतात. या कारणास्तव पर्यटकांनी सावधगिरी बाळगून पर्यटन करणे आवश्यक आहे.

तर, या हंगामात कास पठारावर Kas Pathar पर्यावरणप्रेमी आणि शाळकरी मुले यांची विशेष गर्दी दिसून येईल.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews