व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

अबब!! महिलेच्या शरीराभोवती अजगरचा विळखा ; व्हिडीओ पाहून थरकाप || Python viral video

By Rohit K

Published on:

Python viral video

Python viral video: अजगराच्या विळख्यात अडकलेल्या महिलेची थरारक सुटका; व्हिडीओ पाहून थरकाप

Python Viral Video: अजगरासारख्या प्रचंड प्राण्याच्या हल्ल्याचा विचार जरी केला तरी कोणालाही धडकी भरू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार घडला थायलंडमध्ये, जिथे एका ६४ वर्षीय महिलेवर अजगराने भयानक हल्ला केला. महिलेवर अजगराने विळखा घालून तिला गिळण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी पाहा :धडकी भरवणारा हॉरर शो! तरुणी लागली रडायला; पुढे जे घडल….धडकी भरवणारा व्हिडीओ || Horror-show Viral Video

अजगराने महिलेच्या शरीराला घातला विळखा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

अजगराने थायलंडमधील अरोम अरुणरोज या महिलेवर हल्ला केला. ६४ वर्षीय अरोम आपल्या स्वयंपाकघरात असताना अचानक महाकाय अजगराने तिच्यावर झडप घातली. अजगराने तिच्या शरीराभोवती पूर्णपणे विळखा घातला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन तासांपर्यंत ही महिला अजगराच्या विळख्यात अडकून संघर्ष करत होती, परंतु स्वतःची सुटका करण्यात ती अपयशी ठरली.

शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचला जीव

महिलेने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला आणि शेजाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी वन विभागाला कळवले आणि तत्काळ वनविभागाच्या टीमला बोलावले. टीमने घटनास्थळी पोहोचून अजगराच्या जबड्यातून महिलेची सुटका केली. ही संपूर्ण प्रक्रिया दोन तास चालली. अजगराने महिलेच्या पायावर चावा घेतल्याने ती जखमी झाली होती. मात्र, तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील अनेकजण चकित झाले आहेत. अजगरासारख्या महाकाय प्राण्याच्या तावडीतून सुटलेल्या महिलेची सुटका ही खूपच धक्कादायक आणि थरारक होती. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाहा हा व्हिडीओ: 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews