Vulgure dance viral video: अरे ! काय हा प्रकार, डॉक्टरांनी वाजवल्या शिट्या आणि बाकीच्याच्या ठेक्यांमुळे व्हिडीओ व्हायरल
वैद्यकीय परिषदेतील अश्लील डान्स: डॉक्टरांच्या शिट्ट्या आणि ठेक्यांमुळे व्हिडीओ व्हायरल
चेन्नई: सोशल मीडियावर सध्या एका वैद्यकीय परिषदेतील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या Vulgure dance viral video व्हिडीओमध्ये एका महिलेचा अश्लील डान्स दिसत असून, उपस्थित काही डॉक्टर या डान्सचा आनंद घेत शिट्ट्या मारताना आणि तिच्यासह थिरकत असल्याचं स्पष्ट दिसतं. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
आणखी पाहा : अबब!! महिलेच्या शरीराभोवती अजगरचा विळखा ; व्हिडीओ पाहून थरकाप || Python viral video
हा प्रकार चेन्नईत १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या *असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदे*त घडला. या परिषदेच्या एका सत्रात मनोरंजनाचा भाग म्हणून महिलेचा डान्स ठेवण्यात आला होता. परंतु, डान्स अत्यंत अश्लील असल्याने सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ‘Ra Ra Rakkamma’ या कन्नड गाण्यावर महिला डान्स करताना दिसली. त्यावेळी काही डॉक्टर तिच्यासह थिरकण्यासाठी पुढे आले, तर काहींनी शिट्ट्या वाजवत जल्लोष केला.
या Vulgure dance viral video व्हिडीओमुळे लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हा प्रकार लज्जास्पद आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुचित असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यानेही, “हे मानवी शरीरशास्त्रातील कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाचा भाग आहे?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही जणांनी या प्रकाराचं समर्थन केलं असून, डॉक्टरांनी त्यांचं कठीण आयुष्य थोडं एन्जॉय केलं तर त्यात काही चूक नाही, असं मत मांडलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला या डान्सला ‘अत्यंत क्रिंज’ म्हणत, या प्रकाराचा तीव्र विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेला हा व्हिडीओ अनेकांना विचार करायला लावणारा ठरत आहे.
पाहा हा व्हिडीओ :
This annual conference of the Association of Colon and Rectal Surgeons of India, held in Chennai on 19th to 21st Sep . What I want to know from @IMAIndiaOrg is this some kind of training in human anatomy? Old doctors grabbing a women in public is what part of medicine practice? pic.twitter.com/KGQIXk4QFW
— Sutirtha (@ginger_bread_s) September 23, 2024