October Rashi Bhavishya: ऑक्टोबर महिन्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने; गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!
October Rashi Bhavishya & Marathi Panchang: आज १ ऑक्टोबर असून हा दिवस भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. विशेष म्हणजे आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल योगाचा संयोग झालेला आहे, ज्यामुळे हा दिवस गुंतवणुकीसाठी तसेच अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी उत्तम मानला जात आहे. मंगळवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्री ९.३८ पर्यंत असेल, तर शुक्ल योग ९.१५ पर्यंत. तसेच राहू काळ दुपारी ३ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० पर्यंत राहील. आज चंद्र सिंह राशीत आहे, चला तर मग जाणून घेऊ या, तुमचं राशीभविष्य! October Rashi Bhavishya
१ ऑक्टोबर राशिभविष्य:
मेष: घरात आनंदमय वातावरण राहील. मुलांसोबत वेळ मजेत घालवाल. काही धार्मिक कार्यांमुळे मनःशांती लाभेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होईल. मनातील इच्छा व्यक्त कराल.
वृषभ: हवी असलेली उत्तरे मिळतील. नवीन योजना आखावी लागेल. पुढील योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. मानसिक शांती लाभेल आणि घरात तुमच्या मताला महत्त्व मिळेल.
मिथुन: जुने कर्ज वसूल होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची मदत होईल, आणि कुटुंबातून चांगली बातमी येईल.
कर्क: मानसिक अशांतता जाणवेल. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ. हातातील काम यशस्वी होईल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.
सिंह: व्यावसायिक जबाबदारी नीट पार पाडाल. प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा जाईल, पण कार्यक्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य मिळेल.
कन्या: मित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण असेल. बोलताना संयम बाळगा. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ: आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:च्या इच्छांना अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. व्यावसायिकांना लाभ होईल.
वृश्चिक: अचानक धनलाभ होईल. गुंतवणुकीला अनुकूल काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. कामातील अडचणी दूर होतील. नवीन ओळखी होतील.
धनू: नातेवाईकांच्या सल्ल्याचा विचार करा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करा. राजकारणापासून दूर राहा. मित्रांना मदत कराल.
मकर: काम आणि वेळेचे योग्य नियोजन करा. चुकीच्या गोष्टींना महत्त्व देऊ नका. नियम पाळा आणि अति विचार करत बसू नका. भावंडांची मदत घ्या.
कुंभ: कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. इतरांचे बोलणे मनावर घेऊ नका. व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. भागीदारी व्यवसायात सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
मीन: अंग मेहनतीने काम करा. मित्रांशी जुनी भेट होईल. नवीन संपर्कातून काही फायदेशीर गोष्टी समोर येतील. नोकरदारांसाठी दिवस समाधानकारक असेल. संयमाने कामे करा.