व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Aashadhi Vari Viral Video: ९४ वर्षीय वृद्धाची ५६ वी आषाढी वारी

By Rohit K

Published on:

Ashadhi Vari Viral Video

Aashadhi Vari Viral video: ९४ वर्षीय वृद्धाची ५६ वी आषाढी वारी(Aashadhi vari)

Aashadi vari Viral video: पंढरपूरच्या आषाढी वारीत वृद्धाची ५६ वी यात्रा 

आषाढी एकादशी सोहळा आणि वारकऱ्यांची परंपरा

आषाढी एकादशी सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हजारो वारकरी आणि विठ्ठलभक्त पायी वारी करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतात. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. वर्षानुवर्षे ही परंपरा वारकरी न चुकता पाळताना दिसून येतात.

Aashadhi Vari Viral video:   ९४ व्या वर्षी ५६ वी वारी करणाऱ्या वृद्धाचा व Viral video

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची ५६ वी वारी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ वारीदरम्यानचा आहे जो आता व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये वृद्धाची ऊर्जा आणि भक्ती Aashadhi Vari

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसेल. त्यांच्या डोक्यावर कपड्याची पिशवी आहे, त्यांनी पांढरी धोती आणि सदरा घातला आहे. खांद्यावर घोंघडी घेतली आहे आणि डोक्यावर केशरी रंगाचा फेटा बांधला आहे. कपाळावर चंदनाचा टिळा लावला आहे, हातात काठी घेतली आहे आणि खांद्यावरून एका बाजूला पिशवी धरली आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी सुद्धा त्यांची ऊर्जा पाहून तुम्ही अवाक् व्हाल. व्हिडीओच्या शेवटी ते म्हणतात, “काही माझं दुखत नाही.. फिकत नाही.”                                                                                                                                                                                                  इन्स्टाग्रामवर व्हिडीओची लोकप्रियता Aashadhi Vari

Video बगण्यास खाली जा… @mi_bhatka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वय वर्षे ९४ आणि ५६ वी वारी…९४ व्या वयात काही माझं दुखत नाही फिकत नाही म्हणत आळंदी हून आलेले माऊली पुढे पंढरपूरला निघाले…. दिवे घाट चढून वर आल्यावर माऊलींना बाम वगैरे काही हवं आहे का असं विचारलं असतं. माऊलींनी दिलेल्या ह्या उत्तराने आम्ही थक्क झालो. हात जोडले, त्यांना सलाम केला… वारीतच बघायला मिळतात अशी प्रचंड ऊर्जा असलेली माणसं… पांडुरंग अशा रुपात येऊन आयुष्याला नवीन मार्ग दाखवून जातो. नवीन ऊर्जा देऊन जातो. हे कायम अनुभवायला मिळत वारीत.”

युजर्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा भक्तांना मान द्या विठ्ठलाच्या पूजेचा” तर एका युजरने लिहिलेय, “बाबा तुमच्यात विठ्ठल दिसला. राम कृष्ण हरी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांच्या पुण्याईने तर जग चालत आहे…” एक युजर लिहितो, “महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आषाढी वारीतील (Aashadhi vari)भक्तांचा आदर्श    

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील भक्ती आणि संस्कृतीचा एक प्रतीक आहे. या वृद्ध व्यक्तीची ५६ वी वारी आणि त्यांच्या अथक ऊर्जा हे सगळ्यांना प्रेरणा देणारे आहे. अशा भक्तांच्या कथा ऐकून आणि पाहून आपल्याला त्यांच्या श्रद्धेची आणि भक्तीची ताकद कळते. वारी ही फक्त एक परंपरा नाही, ती एक आध्यात्मिक यात्रा आहे जी प्रत्येक भक्ताच्या मनाला नवीन ऊर्जा देते.

पाहा viral video:Aashadhi Vari Viral Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubham Hinge (@mi_bhatka)

                                                                                                                                                आणखी वाचा :Delhi metro shiv tandav:दिल्ली मेट्रोमध्ये शिव तांडव स्तोत्र गायलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews