व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ABHA health card: अजून आभा हेल्थ कार्ड काढले नाही? जाणून घ्या काय आहे आभा हेल्थ कार्ड. फायदे आणि उपयोग

By Rohit K

Published on:

ABHA health card

ABHA health card: अजून आभा हेल्थ कार्ड काढले नाही? जाणून घ्या काय आहे आभा हेल्थ कार्ड. फायदे आणि उपयोग

ABHA health card: आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय?

ABHA health card, म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर, हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. या कार्डमध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती संग्रहीत केली जाते. हे कार्ड आधार कार्डसारखे असून, त्यावर एक 14 अंकी युनिक नंबर असतो. हा नंबर वापरून डॉक्टर तुम्हाला दिलेल्या उपचारांची आणि वैद्यकीय इतिहासाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

आणखी पाहा : डिजिटल रेशन कार्ड: मोबाईलमधून एका मिनिटांत डाउनलोड करा! || Ration Card Download

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ABHA हेल्थ कार्डचे फायदे

ABHA health card हेल्थ कार्डचे अनेक फायदे आहेत. तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुमचे वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन बाळगण्याची गरज नाही. तुमचा रक्तगट, आजारपणाची माहिती, आणि कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेले होते हे सर्व ऑनलाइन उपलब्ध होईल. हे कार्ड विमा कंपन्यांशी जोडलेले आहे, ज्यामुळे विम्याचा दावा करणे सोपे होते. तसेच, तुमचे वैद्यकीय अहवाल आणि मेडिकल स्लिप्स गहाळ होण्याची भीती राहत नाही.

ऑनलाइन ABHA कार्ड मिळवण्याची पद्धत

ABHA  health card हेल्थ कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://ndhm.gov.in/ या वेबसाइटवर जा. तिथे “Create ABHA Number” या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरून हे कार्ड काढू शकता. आधार कार्ड वापरण्यासाठी, तुमचा आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि OTP द्वारे पडताळणी करावी लागेल.

त्यानंतर, स्क्रीनवर तुमचे आधार कार्डवरील नाव, लिंग, जन्मतारीख, आणि पत्ता दिसेल. या माहितीची पडताळणी केल्यानंतर, तुमचा ABHA नंबर तयार होईल. याला तुमच्या प्रोफाइल डिटेल्ससोबत लिंक करून तुम्ही तुमचा आभा अ‍ॅड्रेस तयार करू शकता.

ABHA हेल्थ कार्डची गोपनीयता आणि सुरक्षितता

ABHA health card हेल्थ कार्डमध्ये गोपनीयतेचे खूप महत्त्व दिले गेले आहे. तुमच्या संमतीशिवाय तुमचा वैद्यकीय इतिहास कोणालाही दिसणार नाही. कारण, तुमच्या मोबाईलवर OTP पाठवून तुमची संमती विचारली जाते. त्यामुळे, तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते.

आयुष्यमान कार्ड आणि ABHA हेल्थ कार्डमध्ये काय फरक आहे?

आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इंश्युरन्स कार्ड आहे, जे गरीब कुटुंबांसाठी उपलब्ध असते. याउलट, ABHA कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाऊंट आहे, जे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी उपलब्ध आहे. आयुष्यमान कार्ड आर्थिक मदतीसाठी उपयुक्त आहे, तर ABHA कार्ड वैद्यकीय इतिहास समजून घेण्यासाठी उपयोगी ठरते.

ABHA हेल्थ कार्ड हे तुमच्या आरोग्याचे डिजिटल रूप असून, ते तुमच्या वैद्यकीय सेवेला सुलभ करते. या कार्डच्या मदतीने, तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित आणि सहजपणे ठेवू  शकतो.

फक्त 60 रुपयात ABHA हेल्थ कार्ड काढण्यासाठी येथे संपर्क करा किव्हा whatsapp करा : 9022401149-प्रतीक्षा

ABHA health card
ABHA health card

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews