Bangladesh Hindus Protest: बांगलादेशी हिंदूंची आसामच्या सीमेवर गर्दी? व्हिडीओ खरा, पण कधीचा? जाणून घ्या सत्य
Bangladesh Hindus Protest: बांगलादेशी हिंदूंची आसामच्या सीमेवर गर्दी? व्हिडीओ खरा, पण कधीचा? जाणून घ्या सत्य
बांगलादेशातील हिंदूंच्या Bangladesh Hindus Protest संदर्भातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडीओ खासकरून चर्चेत आला आहे. दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ बांगलादेश आणि आसाम सीमेवरील असून, बांगलादेशी हिंदू आसाममध्ये प्रवेश करण्यासाठी भारत-बांगलादेश सीमेजवळ जमले आहेत.
व्हिडीओची तपासणी
लाइटहाऊस जर्नलिझमने या व्हिडीओची पडताळणी करताना तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये काटेरी तारांच्या कुंपणाजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याचे दिसत आहे. याबाबत दावा करण्यात आला आहे की, हे लोक बांगलादेशी हिंदू आहेत जे आसाममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.(Bangladesh Hindus Protest)
सत्य काय?
तपासादरम्यान, हा व्हिडीओ बांगलादेशशी संबंधित असल्याचे समोर आले. मात्र, तपशीलवार पडताळणीनंतर लक्षात आले की, हा व्हिडीओ २०१८ सालचा आहे. यूट्यूबवर “India Bangladesh milan mela” नावाने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये हे दृश्य दिसते. यूट्यूबवरील “YOUR FRIENDS” नावाच्या चॅनेलवर देखील “India Bangladesh Milan Mela 15 April 2018” या नावाने तो व्हिडीओ आढळतो.
आसाम पोलिसांचा खुलासा
आसाम पोलिसांनी एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट शेअर करत स्पष्ट केले की, हा व्हिडीओ २०१८ सालचा आहे आणि त्याचा सध्याच्या घटनांशी काहीही संबंध नाही. त्यांनी आवाहन केले की, अशा प्रकारे चुकीचा दावा करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
व्हायरल दावा दिशाभूल करणारा
निष्कर्षतः, साल २०१८ मधील भारत-बांगलादेश मिलन मेळ्याचा हा जुना व्हिडीओ आता बांगलादेशी हिंदू आसाम सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे हा दावा पूर्णतः दिशाभूल करणारा आहे.
पाहा हा विडियो:
सोशल मीडिया पर यह वीडियो आया है और बताया जा रहा है बांग्लादेश की जो सीमा असम से लगी हुई है वहां पर बांग्लादेश की ओर से कई हिंदू परिवार भारत में शरण लेने के लिए भारत बांग्लादेश बॉर्डर पर खड़े हैं…. pic.twitter.com/NV106hXW9Y
— Yati Sharma (@yati_Official1) August 7, 2024