Bank Account Aadhaar Link: सध्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरले जात आहेत. अर्ज भरण्यासाठी महिलांना सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेले पाहायला मिळत आहेत. राज्य शासनाने या योजनेची तीन वेळा नवीन जीआर काढून योजनेबद्दल केलेले आहेत. अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज हे अप्रुव्हल झालेले आहेत. आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रोवन झाले आहेत. त्या महिलांना 17 ऑगस्ट 2024 म्हणजेच की रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Bank Account Aadhaar Link
लाडके बहिण योजनेचा अर्ज अप्रोवल झाला आहे. परंतु अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याचे पुढे आलेले आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. त्या महिलांनी आपल्या आधार कार्डशी बँक खाते लिंक करून घ्यावेत. या योजनेचे पैसे सरकारकडून डीबीटी द्वारे थेट महिलांच्या बँक खाते मध्ये पाठवण्यात येणार असल्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तसेच बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणे देखील आवश्यक आहे. ( Bank Account Aadhaar Link )
आपल्या बँक खात्याला आधार सिडिंग ऍक्टिव्हेट आहे का हे चेक करण्यासाठी पुढील प्रमाणे प्रोसेस करा
1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेची लिंक आहे. हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. https://uidai.gov.in/
2) यानंतर माझा आधार या पर्यायावर क्लिक करावे.
3) पुन्हा ड्रॉप डाऊन मेनू मध्ये आधार
सेवा निवडा वर क्लिक करावे.
3) आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंग साठी स्थिति तपासा या पर्यायावर क्लिक करावे.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकावा तसेच यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येतो तो टाका.
त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी कोणते बँक खाते लिंक आहे ते तुम्हाला दाखवले जाते.
तुमच्या बॅंक खात्याला आधार सिडिंग ॲक्टिव आहेत. का? हे चेक करा येथे क्लिक करा!
जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नसेल किंवा बँकेत जाऊन आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करून घ्यावी अन्यथा लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमचा अर्ज अँप्रोवल असताना देखील सुद्धा तुम्हाला मिळणार नाही याची नोंद घ्यावी.