Bhandara News: तक्रार करायला गेलेल्या तरुणीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केली शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल
Bhandara News: भंडाऱ्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे, ज्यात एका तरुणीला तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेले असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhandara News: प्रेमप्रकरणातील वादाची सुरुवात
25 वर्षीय तक्रारकर्त्या तरुणी ही लाखनी तालुक्यातील असून इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. तिचे नागपूरला शिक्षण घेत असताना गडचिरोली येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. सात वर्षांपासून चालत असलेल्या या प्रेमसंबंधात तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, लग्नाचा विषय निघताच तो टाळाटाळ करत होता, त्यामुळे तिने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
Bhandara News: पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमधील संतापजनक घटना
1 जूनला पीडित तरुणीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. बागुल यांनी तिला केबिनमध्ये बोलावून, “तू सुंदर आहेस, आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे आणि मदत करीन, पण माझी एक अट आहे. आपण एकदम क्लोज फ्रेंड बनू, तू सुशिक्षित आणि सुंदर आहेस. मी अजूनही तरुण आहे, आपण डेटवर जाऊ. माझ्या वयावर जाऊ नकोस, मी तुझं आयुष्य बदलून टाकेन आणि तुला कधीच एकटी सोडणार नाही,” असे बोलले असल्याचे पीडित तरुणीने सांगितले.
पोलिसांनी घेतली तात्काळ कारवाई
तरुणीने या संतापजनक प्रकारामुळे तात्काळ भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या विरोधात भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
भंडारा न्युज: पुढील कारवाईकडे लक्ष
या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मोठा संताप निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ. अशोक बागुल यांच्यावर कडक कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी पाहा व्हिडियो च्या साहाय्याने:
निष्कर्ष
भंडाऱ्यात घडलेल्या या संतापजनक घटनेने पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर आणि महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणाच्या तपासातून सत्य समोर येईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.