व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सुरज चव्हाणविषयी ‘या’ मराठी अभिनेत्याने का केलं असं वक्तव्य? जाणून घ्या…|| Bigg Boss Marathi Season 5

By Rohit K

Published on:

Bigg boss Marathi season 5

Bigg Boss Marathi Season 5 : सुरज चव्हाणविषयी ‘या’ मराठी अभिनेत्याने का केलं असं वक्तव्य? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi Season 5: सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकू नये, मराठी अभिनेत्याचं ठाम मत

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं Bigg Boss Marathi Season 5 पर्व सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वातील स्पर्धकांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रत्येक आठवड्यात स्पर्धकांच्या वादग्रस्त विधानांमुळे शो चांगलाच चर्चेत राहिला आहे. यामुळे काही स्पर्धकांना प्रचंड ट्रोलही केलं जात आहे. अलीकडेच जान्हवीने पंढरीनाथ कांबळेवर केलेल्या टीकेनंतर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी जान्हवीला तिच्या वर्तनासाठी खडेबोल सुनावले आहेत. मात्र, सुरज चव्हाण या वादांपासून दूर राहत महाराष्ट्राच्या मनात घर करून आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या सुरजने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्यामुळे त्याला प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

आणखी पाहा : भारतात लवकरच टेलिग्राम वर बंदी 50 लाखाहून अधिक आहेत युजर…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व Bigg Boss Marathi Season 5  सुरजने जिंकावं अशी इच्छा अनेक मराठी कलाकार व्यक्त करत आहेत. मात्र, या चर्चेत असलेल्या अभिनेत्याने सुरजविषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या मल्हार म्हणजेच अभिनेता कपिला होनरावने सुरजविषयी आपली मते मांडली आहेत. ‘मराठी मनोरंजन विश्व’ या युट्यूब चॅनलवर संवाद साधताना कपिलला बी टीमबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी बी टीमचं कौतुक करताना कपिलने सुरजचंही विशेष कौतुक केलं.

कपिलने म्हटलं, “सुरज चव्हाण खूपच जबरदस्त आहे. त्याचं साधेपण आणि प्रामाणिकपणा मनाला भावतो. मला त्याच्याबद्दल खूप सहानुभूती आहे, पण मला असं वाटतं की, फक्त सहानुभूतीच्या जोरावर शो जिंकला जाऊ नये. जर तो फक्त सहानुभूतीच्या आधारावर जिंकला तर जे खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्यांचं नुकसान होईल. सुरजने आपली खेळी अजून सुधारावी आणि ताकदीने खेळावा. तो नक्कीच शो जिंकू शकतो, कारण त्याच्यामागे प्रचंड सहानुभूती आहे.”

तो पुढे म्हणाला, “सुरज घरातील कामं खूप चांगली करतो, ऐकतो. त्याचं काम पाहून मला खूप आनंद झाला, विशेषत: जेव्हा निक्की त्याला काम लावत होती आणि त्याने निक्कीला तोंड देत तिचं सामान न उचलण्याचा निर्णय घेतला. त्या टास्कमध्ये त्याने अरबाजसोबत जी टक्कर दिली, ती जबरदस्त होती. त्यावेळी त्याने महाराष्ट्राचं मन जिंकलं, पण अजूनही त्याने स्वत:ला सिद्ध केलं पाहिजे, कारण त्याच्यात शो जिंकण्याची पूर्ण क्षमता आहे.”Bigg Boss Marathi Season 5

Bigg boss  Marathi season 5
Thanks to Loksatta

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews