Boat sinks viral video: किंकाळ्या आणि आक्रोश, क्षणात बोट उलटली, ३०० प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात पलटी – ‘टायटॅनिक’सारखा भयंकर शेवट कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर सध्या एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ३०० प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडताना दिसत आहे Boat sinks viral video. क्षणात ही बोट समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे पलटी होते आणि प्रवाशांच्या आक्रोशाने वातावरण दणाणून निघते. ‘टायटॅनिक’सारखा विनाशकारी शेवट अनुभवणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल.
नेमकं काय घडलं?
सुरुवातीला हा व्हिडीओ Boat sinks viral video गोव्यातील असल्याचे मानले जात होते, मात्र सत्य समोर आले की हा मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील आहे. एका नदीत ही बोट पलटी झाली होती, ज्यामध्ये तब्बल ३०० प्रवासी होते. या भयंकर अपघातात ७८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितल्यानुसार, ही बोट इस्लामिक उत्सवानंतर प्रवाशांना घरी परत आणत होती. मात्र, बोटीचा तोल गेल्याने ती उलटली आणि अनेक प्रवाशांचे जीव पाण्यात बुडाले.
टायटॅनिकची आठवण करणारा प्रसंग
टायटॅनिकची दुर्घटना जगभर प्रसिद्ध आहे, आणि हा व्हिडीओ पाहिल्यावर तीच आठवण ताजी होते. व्हिडीओत दिसणारी बोट आणि त्या प्रवाशांचे हाल पाहून ही शोकांतिका मनात ठसते. बोट उलटल्यावर प्रवाशांच्या किंकाळ्या आणि पाण्यात पडल्याची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत.
व्हायरल झालेला व्हिडीओ
@priyarajputlive नावाच्या एका एक्स (पूर्वी ट्विटर) वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्यावर चर्चेची लाट उसळली आहे.
पाहा हा व्हिडीओ :
अफ़्रीकी के कांगो में बोट पलटने से 78 लोगों की मौत pic.twitter.com/4A70kUlzYt
— Priya singh (@priyarajputlive) October 5, 2024