व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Cibil Score New Rule 2024 आरबीआयने CIBIL स्कोरच्या नियमात केला मोठा बदल; एकदा संपूर्ण माहिती पहा, अन्यथा होऊ शकते नुकसान..

By Rohit K

Published on:

Cibil score New Rule   : नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण एखादे बँकेकडून नवीन कर्ज घेतो तेव्हा बँकेकडून आपला सिबिल स्कोर तपासला जातो. कोणतेही कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नुकत्याच नवीन अपडेट नुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सिबिल स्कोर च्या बाबतीत एक नवीन नियम बनवला आहे या नियमानुसार आता दर पंधरा दिवसांनी तुमचा सिव्हिल स्कोर कमी किंवा जास्त झाला हे अपडेट होणार आहे.Cibil score New Rule

यामुळे याचा फटका ग्राहकांना बसणार की फायदा होणार याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ग्राहकांना आपला सिबिल स्कोर मेंटेन ठेवण्यासाठी आता मेहनत घ्यावी लागणार आहे एक चूक जरी झाली तरी लगेच तुमचा सिव्हिल स्कोर कमी होणार.. आता ग्राहकांना कर्जाचे हप्ते क्रेडिट कार्डचे पेमेंट टायमाला भरावे लागणार एखादा हप्ता जरी चुकवला तर लगेच क्रेडिट स्कोर वर याचा परिणाम दिसणार आहे. 

हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. जर तुम्हाला हा नियम माहित नसेल आणि त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर खराब झाला तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी बँकांमध्ये फेऱ्या माराव्या लागतील.

Cibil score New Rule याचा फटका कोणाला बसणार?

दर पंधरा दिवसांनी सिबिल स्कोर अपडेट होण्याचा फटका नेमका कोणाला बसणार. जे ग्राहक बँकेच्या कर्जाचा EMI वेळेवर भरत नाहीत अशा ग्राहकांना याचा जबरदस्त फटका बसणार आहे. कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्यामुळे अशा ग्राहकांचा सिबिल स्कोर एकदम कमी होऊन त्यांना त्यापुढे कोणतेही कर्ज मिळणार नाही. कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांच्या अडचणीत  यामुळे वाढ होईल.

Cibil score New Rule  कोणाला होणार फायदा..??

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या निर्णयामुळे बँक आणि ग्राहक या दोघांनाही याचा फायदा होईल. जे ग्राहक आपल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरतील., किंवा जे ग्राहक क्रेडिट कार्डचा EMI वेळेवर भरतील अशा ग्राहकांना याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोर वर चांगला परिणाम होऊन त्यांना विविध बँकांच्या लोन लवकरात लवकर मिळतील.

चांगला क्रिकेट स्कोर असल्यावर ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात चांगल्या प्रमाणात सूट मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर कर्ज मिळेल. यामुळे बँकेला देखील कळेल की कोणत्या ग्राहकाला कर्ज द्यायचे आणि कोणत्या ग्राहकाला नाही.Cibil score New Rule

या निर्णयाचा फायदा कर्ज घेणारे आणि देणारे दोघांनाही होणार आहे. बँका आणि NBFC दोन्हीसाठी योग्य क्रेडिट माहिती खूप महत्त्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात.

Mudra Loan In Marathi 2024: लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ || संपूर्ण माहिती !

CIBIL दर 15 दिवसांनी अपडेट केला जाईल

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार आता महिन्याच्या 15 तारखेला आणि 30 तारखेला म्हणजेच एका महिन्यात दोन वेळा क्रेडिट स्कोर अपडेट केला जाणार आहे.. विविध बँका आणि वित्तीय संस्था यांना पंधरा दिवसाच्या आत क्रेडिट स्कोर अपडेट करणे बंधनकारण करण्यात येणार आहे असे आरबीआयने म्हटले आहे. Cibil score New Rule

डिफॉल्टची संख्या कमी होऊ शकते

क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसाला अपडेट झाल्यामुळे बँकांचा चांगल्याच प्रमाणात फायदा होणार यामुळे बँकेना डिफॉल्टर ग्राहक लवकरात लवकर सापडतील आणि बँकेचे होणारे नुकसान कमी होईल. दर पंधरा दिवसांनी क्रेडिट स्कोर अपडेट झाल्यामुळे ग्राहकांचा योग्य तो आणि अचूक डाटा बँकेकडे जाईल त्यामुळे बँकेला कर्ज देणे सोयीचे ठरेल. चांगल्या क्रेडिट स्कोर मुळे योग्य ग्राहकाला कर्ज दिल्यास बँकेचा नक्कीच फायदा होईल आणि यामुळे डिफॉल्टर ग्राहक सापडल्या जातील.

Business Loan Schemes for Women महिलांना या बँका देत आहेत व्यवसाय उभारण्यासाठी 30 लाखापर्यंत कर्ज..

Cibil score New Rule
Cibil score New Rule

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews