Cibil score report
CIBIL स्कोअरचा अर्थ काय? घरबसल्या कसा चेक कराल? जाणून घ्या संपुर्ण माहिती..
तुम्हाला क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का बघतात, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
घर, मालमत्ता किंवा एखादी गाडी खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. अनेकवेळी आपल्याला एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात.
पण तुम्हाला माहिती आहे का? कोणतीही बँका किंवा वित्तीय कंपनी कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते.
क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कार्ड विमा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. कार्ड हरवल्याची सूचना बँकेला दिल्यानंतरही कुठला गैरव्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी तुमची नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. मात्र बँकेला रिपोर्ट करण्याआधीच्या काळात चोराने कुठला व्यवहार केला असेल, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो.
तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.