Cotton Market Rate – नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस बाजारातील सुधारणा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील भाव आज देखील सुधारले होते. इंटर कॉन्टिनेन्टल एक्सचेंज अर्थात अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये कापसाचे भाव काल आणि आज सायंकाळपर्यंत तब्बल पाच टक्क्यांनी वाढले होते. तर प्रत्यक्ष खर्चाचे भाव सुद्धा सुधारले होते देशांमध्ये सुद्धा वायद्यांमध्ये चांगली वाढ झाली होती. आणि प्रत्यक्ष खरेदीचे भाव म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव गेल्या दोन दिवसांमध्ये क्विंटल मागं पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलाय.
Cotton Market Rate
मग आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की, या पुढच्या काळात आणि त्यातल्या त्यात चालू मार्च महिन्यामध्ये कापसाचा बाजार नेमकं कसा राहू शकतो.आणि याचाच आढावा आज आपण या माहितीतून घेणार आहोत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बाजारातील कापसाची आवक ही एक लाख गाठींपेक्षा कमी होत गेले. आज सुद्धा बाजारातील आवक ही कमीच होते. आज 80 हजार गाठींपेक्षा सुद्धा कमी आवक झाल्याचं व्यापारी सांगत होते. आता आवक कमी झाल्यामुळे देशातील बाजारातील सुधारणा हे कायम आहे.
आज बहुतांश बाजारांमध्ये कमाल भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव 8100ते 8200 रुपयांच्या दरम्यान होता. आणि ही भाव पातळी काल आणि परवा सुद्धा काही बाजारांमध्ये आपल्याला दिसून आली होती. पण जर आपण सरासरी भाव पाहिला सरासरी भाव म्हणजे ज्या भावात जास्त माल विकला जातो. तो भाव आपल्याला आज रोजी सुद्धा सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय.
आता आपण जर जागतिक बाजारातील कापसाचे स्थिती पाहिली म्हणजे जागतिक कापूस बाजारातील घडामोडी पाहिल्या तर आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा कापूस बाजारात मोठी पडझड होईल किंवा दर कमी होतील याची शक्यता खूपच कमी आहे. पण हा कापूस दरामध्ये काही प्रमाणात चढ-उतार हे आपल्याला निश्चित दिसतील. कारण बाजारामध्ये चढ-उतार हे सतत दिसतच असतात. आणि त्यातला त्यात आपला कापूस हा जागतिक पातळीवर सर्वात स्वस्त आहेत.
त्यामुळे तर आपल्या कापसाला चांगले मागणी आहे. आणि निराळा सुद्धा चांगले सुरू होते. आणि आता वळूयात मार्च महिन्यामध्ये कापूस बाजाराची परिस्थिती कशी राहू शकतील. याकडे आता मार्च महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं किंवा मेसेज सुद्धा केले होते. की आम्हाला मार्च महिन्यात कापूस विकायचा आहे. मग विक्रीचा निर्णय कसा घ्यावा, तर मार्च महिन्यामध्ये आता सध्या आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त भाव अनेक बाजारांमध्ये आठ हजार किंवा आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय.
पण सरासरी भाव पातळी साडेसात हजार ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये बाजारामध्ये आपल्याला चढ-उतार दिसू शकतात. आणि तशी शक्यता दाट आहे. आता चढ-उतार दिसू शकतात. म्हणजे काय भाव कमी होतील का त्रास नाही. भाव कमी झाले तर ते पुन्हा सुधारतील आणि आपल्या पूर्व पातळीवर जातील फक्त त्या कालावधीमध्ये काही दिवस जावे लागतील.
Cotton Rate March 2024
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यात कापूस विकायचा आहे. किंवा ज्यांनी विक्रीचा नियोजन केलंय त्यांनी बाजारामध्ये 7700 ते 8000 किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक भाव मिळाला तर विक्रीचा नियोजन केलं किंवा कापूस विकला तर फायदा होऊ शकतो. असा अभ्यासक सांगतात.
म्हणजेच काय तर मार्च महिन्यामध्ये चढ-उतार लक्षात ठेवून आपण या दर पातळी दरम्यान जर कापूस विक्रीचे नियोजन केलं तर फायदेशीर ठरू शकत. पण ज्या शेतकऱ्यांना लगेच गडबड नाही किंवा ते जास्त वेळ थांबू शकतात. तर त्या शेतकऱ्यांनी विक्रीचा नियोजन थोडंसं काटेकोर करणं गरजेचं आहे. आपला माल किमान दोन ते तीन टप्प्यांमध्ये विक्री केली तर फायदा होऊ शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, तर त्यांनी चार टप्पे केले तर हरकत नाही.
पहिला टप्पा मार्च महिना दुसरा एप्रिल आणि तिसरा मे महिन्यात जर विकला, तर चांगला सरासरी भाव पदरात पडू शकतो. असा आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलाय पण हे नियोजन करताना आपल्याला बाजारातील चढ-उतार तसेच सरकारचे काय धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजार त्याच्याकडे लक्ष ठेवून असावं पण याचा अर्थ असा नाही, की पुढच्या काळामध्ये आपल्याला कापूस बाजारात मोठी मंदी दिसते. फक्त बाजारातील चढउतारापासून जे काही पॅनिक सेलिंग होतं ते टाळण्याची गरज आहे.
Cotton Market Rate – आता येऊयात कापूस बाजारामध्ये नेमका आज आणि दोन दिवसांमध्ये मागच्या काय घडलं तर, आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेतला त्यातल्या त्यात वायद्यांचा तर आपल्याला असं दिसून येतं की, मागच्या दोन दिवसांमध्ये वायद्यांमध्ये चांगली तेजी आली होती. फक्त आपण कालचाच म्हणजे जर गुरुवारचाच बाजार पाहिला तर वायद्यांमध्ये आपल्याला तब्बल एकाच दिवसात चार टक्क्यांची तेजी दिसते. आणि आज सुद्धा आज सायंकाळपर्यंत कापसाचा वायदा कापसाचा वायदा हा कालच्या तुलनेमध्ये एक टक्क्याने वाढला होता.
म्हणजेच काल आणि आज कापसाचे वायदे हे आपल्याला पाच टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. पण आज शुक्रवार शुक्रवार हा वायदे बाजाराचा आणि बहुतांशी बाजारांमधील व्यवहाराचा शेवटचा दिवस असतो. तो म्हणजे आठवड्याचा कारण शनिवार आणि रविवार बहुत अंश व्यवहार बंद असतात. त्यामुळे आपल्याला दर आठवड्यामध्ये शुक्रवारी बाजारामध्ये बहुतांश वेळा जास्त चढ-उतार दिसून येत असतात. आता हा सायंकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही सुधारणा दिसून आले. ते शेवटच्या सत्रामध्ये नेमकी कशी होती. हे आपल्याला रात्रीच कळेल कारण आंतरराष्ट्रीय बाजारात रात्रीपर्यंत कापसाचे व्यवहार सुरू असतात.
कापूसच नाही तर सगळ्या शेतीमालाचे आणि इतर कम्युनिटीचे व्यवहार चालू असतात. आपण जर गुरुवारचा एकाच दिवसाचा विचार केला तर गुरुवारी कापसाचा वायदा हा 95 सेंटवर खुला झाला होता. आणि बंद झाला तो 98 cent वर म्हणजेच एका दिवसात चार टक्क्यांची तेजी आली होती. आणि आज सायंकाळपर्यंत कापसाचा वायदा हा 101.35 वर पोहोचला होता.
हा जर आपण आपल्या रुपयाने क्विंटल मध्ये कन्व्हर्ट केलं तर हा रेट येतो 18 हजार 482 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच हा भाव रुईचा आहे. कारण वायद्यांमध्ये रुईच्या व्यवहार होतात. कच्च्या कापसाचे आपल्या व्यवहार होत नाहीत. आता देशातल्या वायदाचा विचार केला तर देशांमध्ये आज महाशिवरात्रीमुळे बहुतांश बाजार समितीमध्ये आणि वायद्यांमध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत व्यवहार बंद होते. वायदे बाजारात सायंकाळी पाच वाजता खुला झाला. तो 65 हजार चारशे रुपयांवर आपण जर कालचा व्यवहार पाहिला तर कालच्या व्यवहारांमध्ये वायदे बाजारात तब्बल दीड टक्यांची तेजी आली होती. म्हणजे भाव वाढले होते.
आता वायदे मधला जो काही खंडीचा 65 हजार चारशे रुपये भाव होता. तो जर आपण रुपयात आणि कुंटल मध्ये काढला तर तो येतो 18370 रुपये प्रतिक्विंटल हा सुद्धा रुईचा भाव आहे. कारण खंडी ही रुई पासून तयार केले जातात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, की आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आणि आपले वायदे आता काही प्रमाणात समान पातळीवर चालता येत. पण आता आपल्याला माहिती आहे.
की आपल्या शेतकऱ्यांचा वायद्यांमध्ये सहभाग किती आणि आपल्या शेतकऱ्यांना वायद्यांचा किती फायदा होतो. हा वेगळा अभ्यासाचा विषय तो आपण कधीतरी घेऊयात. पण आपल्यासाठी महत्त्वाचा असतो तो प्रत्यक्ष खरेदीचा भाव की आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदीचा भाव किती आहे. आणि आपल्या देशात किती आहेत, तर आपण आता तो भाव बघुयात आता आंतरराष्ट्रीय बाजारातील आपल्याला जर प्रत्यक्ष खरेदीचे भाव पाहिजे असतील तर त्यासाठी कॉट लूक इंडेक्स बघावा लागतो. आता इंडेक्स आपल्याला कालचा मिळतो.
कारण आजचे जे भाव आहे. ते रात्री उशिरा येत असतात. मग कालचा भाव किती होता. तो होता 101 पूर्णांक 95 सेंड प्रतिपाउंड आपण जर आपल्या रुपयात काढलं, तर तो येतो 18 हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल रुळीचा भाव. आता हा झाला आंतरराष्ट्रीय बाजारातला भाव मग आपल्या देशात भाव किती होता. तर आपल्या देशात खंडीचे प्रत्यक्ष खरेदीचे भाव हे 62 हजार रुपयांच्या दरम्यान होते. आणि आपण जर समजा आपल्या कुंटलचा भाव काढला, तर तो येतो 17400 रुपये म्हणजेच, काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात पेक्षा प्रत्यक्ष खरेदीतील कापसाचे भाव हे आपल्या देशामध्ये आज रोजी सुद्धा किमान 1200 रुपयांनी कमी आहे.
तर आपला जो काही कापूस आहे. लांब धाग्याचा आहे. तसेच आहे त्याचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे हे गणित आता सध्या तरी कोणी मांडत नाही किंवा कुणीतरी आहे. तिचा विचार सध्या करत नाही लांब धाग्याच्या कापसाचा जो काही अत्यंत लांब धाग्याचा कापूस आहे. की ज्याचे उत्पादन आपल्या देशात होत नाही. त्याच्या आहेत तर करावेच लागते आणि ते सुरूच राहते. त्यामुळे आपला कापसाचा भाव जोपर्यंत आंतराष्ट्रीय बाजारात स्वस्त आहे. तोपर्यंत आपल्याकडे कापसाचे आयात होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आयात व्हायची असेल तर आपल्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कैसे वाढावे लागतील. किंवा किमान त्या पातळीवर पोहोचावे तरी लागतील परंतु आत्ता तरी ही परिस्थिती दिसून येत नाही. कारण सध्या तरी आपले भाव सगळ्यात कमी आहे.
आता वायद्यांमध्ये आणि प्रत्यक्ष खरेदीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही भाव वाढले. हे भाव नेमकं सोमवार टिकून राहतात का त्यानुसार आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कसे भाव राहतील. हे सुद्धा पहावे लागेल कारण जसा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो. आणि शुक्रवारी आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चव उतर दिसून येत असतात. आता हे चड-उतार सोमवारी नेमकं कशी प्रतिसाद देतात. आणि बाजार कसा ओपन होतो. आणि कसा टिकून राहतो. हे आपल्याला पहावं लागेल आणि त्यानुसारच आपल्या देशातील बाजाराचा परिणाम कसा होईल. ते सुद्धा आपल्याला सांगता येईल.
पोस्ट ऑफिस ५२० रुपये योजना लगेच करा अर्ज
अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेबसाइट ला विजिट करा. धन्यवाद..!