व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हा काय नवीन प्रकार..! गजरा नाही तर केसात फटाके; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात, “हेच पाहायचे बाकी होते” || Crackers in Hair

By Rohit K

Published on:

Crackers in Hair

Crackers in Hair : हा काय नवीन प्रकार..! गजरा नाही तर केसात फटाके; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात, “हेच पाहायचे बाकी होते”

दिवाळीचा अनोखा ट्रेंड
दिवाळीच्या आनंदात सर्वत्र उत्सवाचा माहोल आहे. घराघरांत फराळ, फटाक्यांचा धुमधडाका, आणि नवीन कपडे, यांची सजावट दिसून येते. याच दिवाळीमधील एक विचित्र आणि मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दिसते, जिने फुलांच्या गजराच्या ऐवजी केसात थेट फटाके माळले आहेत! केसांत चकरी, फुलझडी, अॅटम बॉम्ब अशा फटाक्यांचा माळा घातलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.

आणखी पाहा : शाळेतील दोन शिक्षिका भरवर्गात भिडल्या, मुलांचं भविष्य धोक्यात? व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण || Teachers Fight Viral Video

फुलांच्या जागी फटाक्यांचा गजरा
व्हिडिओमध्ये महिलेने सुंदर पद्धतीने जुडा घालून त्याभोवती चकरी, अॅटम बॉम्ब आणि फुलझडी माळल्या आहेत. तिच्या या क्रिएटिव्हिटीला पाहून अनेक लोकांनी हसून हसून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला असावा, असेही अनेकांचे मत आहे. त्यामुळे अनेकांनी त्यावर हसण्याचे आणि आश्चर्याचे इमोजी टाकले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया
Instagram अकाउंट @suhani_makeup.studio वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर “दिवाळीसाठी ब्रायडल पटाका बन” असे कॅप्शन आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “फक्त एक आगपेटी हवी,” तर दुसऱ्याने लिहिले, “एक चूक महागात पडू शकते!” या मजेशीर प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ आणखीनच व्हायरल झाला आहे.

नेटकरी म्हणतात, “हेच पाहायचे बाकी होते!
सोशल मीडियावर असे अनेक हटकेज व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल होत असतात. लोक विविध प्रकारच्या मजेदार कल्पनांनी मनोरंजनाचे साधन तयार करतात.

पाहा हा व्हिडिओ: 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews