व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Crime News: नागाव आक्षी खाडीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला: परिसरात खळबळ

By Rohit K

Published on:

Crime News

नागाव आक्षी खाडीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला: परिसरात खळबळ

 

Crime News अलिबाग, दि. २४ जून – तालुक्यातील नागाव आक्षी खाडीत सोमवारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अलिबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

 

सोमवारी सकाळी, आक्षी येथील पुलाजवळील खाडी परिसरात फिरत असताना काही स्थानिकांना एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती अलिबाग पोलिसांना दिली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

Crime News || क्राईम न्यूज

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासणीमध्ये मृत इसमाच्या वयाचा अंदाजे ४५ वर्षे असून, तो एक कामगार असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याच्याकडे कोणतेही ओळखीचे पुरावे आढळले नाहीत.

या अज्ञात इसमाच्या मृत्यूने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या घटनेच्या सखोल तपासासाठी विविध दिशांनी चौकशी सुरू केली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळताच ती तात्काळ प्रसारित करण्यात येईल असे अलिबाग पोलिसांनी सांगितले.Crime News

जर कोणाला या इसमाबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली आहे.

🔗 आणखी पाहा: Crime News: त्याने मद्यपान अवस्थेत दाबला तिचा गळा, खुनाचा गुन्हा दाखल,बघा काय आहे बातमी

🔗👉🏻आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा 👈🏻

 

Crime News
Crime News

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews