व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Dancing Pohewale Pune: पुण्यातील डांसिंग पोहेवाले – व्हायरल व्हिडिओ

By Rohit K

Published on:

Dancing Pohewale Pune

Dancing Pohewale Pune: पुण्यातील डांसिंग पोहेवाले – व्हायरल व्हिडिओ

पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, नेहमीच आपल्या अनोख्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखली जाते. या शहरात अनेक प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या ठिकाणांची चर्चा नेहमी होत असते. सध्या पुण्यातील एका विशेष पोहेवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोहेवाल्याला “डांसिंग पोहेवाले” म्हणून ओळखले जाते, आणि त्यांचे पोहे बनवण्याची स्टाइल लोकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

Dancing Pohewale Pune: कोण आहेत हे डांसिंग पोहेवाले?

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे काका म्हणजे प्रवीण शिवाजी पाटील. मूळचे जळगावचे असलेले हे काका त्यांच्या पत्नीसमवेत पुण्यातील कर्वे नगरमध्ये ‘श्री स्वामी कृपा पोहा सेंटर’ चालवतात. या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यात पोहे आणि साबुदाणा खिचडी, तर जेवणात खानदेशी पिठलं-भाकरी, वांगं भरीत भाकरी, कढी-खिचडी, आणि संडेसाठी स्पेशल दालबाटी मिळते.

Dancing Pohewale Pune: डांसिंग पोहेवाले म्हणून कसे झाले प्रसिद्ध?

प्रवीण काका त्यांच्या पोहे बनवण्याच्या अनोख्या आणि डांसिंग स्टाइलमुळे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या खास स्टाइलमुळेच त्यांना काही लोक “वायब्रेटींग पोहेवाले” म्हणतात, तर काही लोक “डांसिंग पोहेवाले” म्हणून ओळखतात. काका सांगतात, “माझे वडीलही हेच काम करतात. आम्ही घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहताना खूप समाधान वाटतं.”

Dancing Pohewale Pune: सोशल मीडियावर कसा झाला व्हायरल?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

राजश्री काटकर यांच्या @rajashri_katkar_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काकांची उत्साही पोहे बनवण्याची शैली दाखवण्यात आली आहे, आणि याला लाखो लोकांनी पाहिले आहे. कर्वे नगरमध्ये, कमिंस कॉलेजजवळ असलेल्या या स्टॉलचे ठिकाणही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिले आहे.

Dancing Pohewale Pune: लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी काकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी काकांच्या पोह्यांची तारीफ केली आहे, तर काहींनी त्यांची खिचडी अत्यंत चवदार असल्याचे सांगितले आहे. एका युजरने लिहिले, “अभिमान वाटतो आपला, जळगावचं नाव रोशन केलं.”

जर तुम्ही पुण्यात असाल, तर ‘डांसिंग पोहेवाले’ काकांचे पोहे नक्कीच एकदा खाऊन पाहा. तुम्हाला त्यांच्या पोहे बनवण्याची अनोखी स्टाइल आणि स्वादिष्ट पोहे आवडल्याशिवाय राहणार नाहीत.Dancing Pohewale Pune

 

🔗आणखी पाहा: Lion Viral Video: सिंहाच्या केसाला हात लावण्याचा प्रयत्न, पर्यटकाला मिळाली धोक्याची खडस, व्हिडिओ व्हायरल

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews