व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ड्रोन दीदी योजना, केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेतून महिलांसाठी विशेषत || Drone Didi Yojana

By Rohit K

Published on:

Drone Didi Yojana

Drone Didi Yojana: ड्रोन दीदी योजना, केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेतून महिलांसाठी विशेषत 

केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेतून महिलांसाठी विशेषत: ड्रोन दीदी योजना Drone Didi Yojana 

ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये लागू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना ३ हजार ड्रोनचं वाटप डिसेंबरपर्यंत केलं जाणार आहे. या महिलांना ड्रोन खरेदीसाठी ८ लाख रुपयांचं अनुदान देण्यात येईल, ज्यामुळे महिलांना शेतीत ड्रोन वापरून विविध कामे सोपी करण्यास मदत होईल.

आणखी पाहा : Sukanya Samruddhi Yojana: 15 वर्षांत 3 पट परतावा, 200% नफा मिळवण्याची सुवर्णसंधी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या Drone Didi Yojana योजनेत २०२४ ते २०२६ दरम्यान १५ हजार महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी शेती योग्य जमिनीचं प्रमाण, नॅनो खतांचा वापर आणि बचत गटातील महिलांची सक्रियता असे निकष लावून राज्यांची निवड केली आहे. या निकषांनुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच ३ कोटी महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. या योजनेतून २ कोटी महिलांना कौशल्य विकासासाठी देखील प्रशिक्षित केलं जाणार आहे. महिलांना केवळ ड्रोन वापरण्याचं प्रशिक्षणच नव्हे, तर ड्रोनचं व्यवस्थापन आणि देखभाल याचंही मार्गदर्शन दिलं जाईल.

या योजनेमुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचा फायदा होईल, असा सरकारचा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी केलेल्या भाषणात १० कोटी महिलांना बचत गटांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं होतं आणि ड्रोन प्रशिक्षण देण्याची घोषणा केली होती.

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सध्या ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीसाठी प्रति एकर ३०० ते ६०० रुपये भाडं आकारलं जातं. एका हंगामात ४ ते ५ वेळा फवारणी करावी लागते. अशा स्थितीत २ हजार एकर जमिनीवर लागणाऱ्या ड्रोनची संख्या २ ते ३ असू शकते.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews