व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Elephant Video: हृदयस्पर्शी हत्तीचा व्हिडिओ व्हायरल: मानव आणि प्राण्यांमधील अनोखं नातं

By Rohit K

Published on:

Elephant Video

Elephant Video: हृदयस्पर्शी हत्तीचा व्हिडिओ व्हायरल: मानव आणि प्राण्यांमधील अनोखं नातं 

Elephant Video: प्राणी व माणूस यांच्यातील नातं हे जगावेगळं आहे. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. काही जण जंगलातील प्राण्यांना बघायला नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहालयात जातात. अनेक जण घरात प्राण्यांना पाळतात, तर काहींना रस्त्यावर भटक्या प्राण्यांना बिस्कीटे, दूध खाऊ घालतात. हे पाहून, आपल्याला माणसांपासून धोका नाही हे लक्षात घेऊन प्राणी सुद्धा प्रेमाची भावना समजून घेताना दिसतात.

आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्राणीसंग्रहालयात आलेल्या चिमुकल्याचा शूज हत्तीने परत केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ चीनचा आहे. चीनच्या प्राणीसंग्रहालयातील एका हृदयस्पर्शी गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका २५ वर्षीय हत्तीने आपल्या दयाळू कृतीने एका चिमुकल्या पर्यटकाचे मन जिंकले आहे.

Elephant Video: हृदयस्पर्शी घटना

चिमुकला त्याच्या कुटुंबाबरोबर प्राणीसंग्रहालयात जंगलातील प्राणी बघण्यासाठी आला होता. सुरक्षित अंतरावर उभा राहून चिमुकला त्यांच्या आई-वडिलांबरोबर हत्ती या प्राण्याला बघत होता. बघता बघता चिमुकल्याने स्वतःचा बूट काढून पलीकडे हत्तीच्या परिसरात टाकला.

Elephant Video: व्हायरल व्हिडिओ पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Reader’s Digest (@readersdigest)

Elephant Video

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की, हत्तीच्या लक्षात येतं चिमुकल्याने त्याची एक चप्पल वा बूट काढून हत्तीच्या परिसरात टाकला. हत्ती देखील हुश्शार… त्याने देखील आपल्या पायाजवळ पडलेल्या चिमुकल्याचा बूट अलगद आपल्या सोंडेने पकडला. हळूवारपणे आपली सोंड चिमुकल्याकडे फिरवून त्याच्या हातात दिला.

या खास प्रसंगानंतर कर्मचाऱ्याने नमूद केले की, हत्तीने चिमुकल्याला मदत केल्याबद्दल ‘माउंटन रेंज’ हत्तीला अतिरिक्त जेवण दिले.

Elephant Video: सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @readersdigest या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘चिमुकल्याचा शूज हत्तीने परत केला’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. तसेच प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, या हत्तीचे नाव ‘माउंटन रेंज’ आहे व तो २५ वर्षांचा आहे. तसेच हत्ती प्राणीसंग्रहालयातील पर्यटकांच्या लाडका आहे. एकूणच पर्यटकांच्या लाडक्या हत्तीने आज सोशल मीडियावर सगळ्यांचे मन जिंकले आहे.

आणखी पाहा: Chor Machaye Shor: चालू ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला घडवली अद्दल पाहा व्हिडिओ

निष्कर्ष

Elephant Video या व्हायरल हत्ती व्हिडिओने मानव आणि प्राण्यांमधील अनोखं नातं पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. साध्या कृतीतून प्राणी ‘माउंटन रेंज’ सारखे प्राणी आपल्या सर्वांना करुणा आणि सहानुभूतीची महत्त्वता दाखवून देतात.

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews