Firoj shaikh:एक-दोन नाही तर 25 महिलांशी लग्न? ‘लखोबा लोखंडे’ पोलिसांच्या जाळ्यात
Firoj shaikh फिरोज शेखचे कारनामे
नालासोपारा पोलिसांनी आधुनिक काळातील ‘लखोबा लोखंडे’ फिरोज शेख याला अटक केली आहे. त्याने दोन-चार नव्हे, तब्बल 25 ते 30 महिलांशी लग्न केले आहे. त्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्येही अनेक महिलांना फसवले आहे.
लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर Firoj shaikh फेक प्रोफाईल
फिरोज शेखने Firoj shaikh लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर फेक प्रोफाईल तयार केला होता. तिथे तो घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना लक्ष्य करत होता. लग्न करून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन तो फरार व्हायचा. मात्र नालासोपारा पोलिसांनी त्याचीच पद्धत वापरून त्याला पकडले.
पोलिसांची यशस्वी मोहीम
आचार्य अत्रे यांचा ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला ‘लखोबा लोखंडे’लाही लाजवेल असे कारनामे या आधुनिक लखोबा लोखंडेने केले आहेत. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एका महिलेच्या नावाने फेक प्रोफाईल बनवले. या सापळ्यात फिरोज शेख अडकला. त्याला कल्याणमधून अटक करण्यात आली.
महिलांची फसवणूक
फिरोज शेखने Firoj shaikh एका लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावरून एका घटस्फोटीत महिलेशी ओळख वाढवली आणि तिच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी 6 लाख 50 हजार 790 रुपये घेतले आणि पसार झाला. त्या महिलेने नालासोपारा पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला.
अटक आणि जप्त मुद्देमाल
नालासोपारा पोलिसांनी फिरोजला पकडण्यासाठी त्याच पद्धतीचा वापर केला. त्याला भेटायला बोलावून सापळा रचला आणि त्याला जेरबंद केले. फिरोजकडून अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड आणि दागिने सापडले आहेत. पोलिसांनी 3 लाख 21 हजार 490 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.