व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Food In Monsoon: पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

By Rohit K

Published on:

Food In Monsoon

पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

Food In Monsoon: पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे, आणि या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आहारतज्ज्ञ अनिता जटाना यांनी पावसाळ्यातील आहाराबाबत काही महत्वपूर्ण सल्ले दिले आहेत. या सल्ल्यांमुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

Food In Monsoon: कोणते पदार्थ खावेत?

तुमचा आहार जीवनसत्त्व, अँटिऑक्सिडंट्स आणि विरघळणारे फायबर्स (soluble fibres) या घटकांनी समृद्ध असावा. तांदूळ, डाळ, चपाती आणि भाज्या ताज्या असाव्यात. शक्यतो अन्न शिजविल्यानंतर पहिल्या तासातच खावे.

संपूर्ण भाज्या

रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या निवडा. दुधी भोपळा, कारले, गवार, भोपळा, गाजर, मटार, ब्रोकोली व कडधान्ये यांचा समावेश करा.

सूप

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कोमट आणि पौष्टिक सूप, जसे- चिकन, भाज्या व डाळी यांचे सूप पावसाळ्यासाठी योग्य आहे. ते पचण्यास सोपे आहेत आणि शरीरात पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात.

हर्बल टी

तुमचे शरीर उबदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आले, तुळशी व पुदीना यांसारख्या हर्बल टीचे सेवन करा. या चहामध्ये औषधी गुणधर्म असतात; जे पावसाळ्यातील सामान्य आजारांपासून बचाव करतात.

फळे

अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध हंगामी फळे खा; परंतु ती धुतलेली आणि ताजी कापलेली आहेत याची खात्री करा. कापलेली फळे फ्रिजमध्ये ठेवू नका.

प्रथिने

तुमच्या जेवणात डाळी, पाश्चराइज्ड- उकळलेले दूध आणि चांगले उकडलेली अंडी यांसारख्या स्रोतांमधून पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतील याची खात्री करा.

मसाले

हळद, दालचिनी, लवंगा व काळी मिरीमध्ये दाहकविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात; जे आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

प्रो-बायोटिक्स

दही आणि ताक यांसारखे पदार्थ आतड्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी उत्तम आहेत; जे चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात.

Calcium Reached Foods: हाडे आणि आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम देणारे 5 पदार्थ

Food In Monsoon: कोणते पदार्थ टाळावेत?

स्ट्रीट फूड

रस्त्यावरील खाद्यपदार्थ, विशेषतः पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर चाट पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ अस्वच्छ परिस्थिती आणि दूषित पाण्यामुळे धोकादायक ठरू शकतात.

कमी शिजविलेले मांस, मासे व अंडी

कमी शिजविलेले मांस, सी-फूड व अंडी खाणे टाळा. त्यात हानिकारक जीवाणू असू शकतात.

चांगले न वाफविलेले सॅलड

चांगले न वाफविलेले सॅलड खाणे टाळा. घरगुती लिंबाचा रस, ताक व नारळ पाणी आपल्या आहारात समाविष्ट करा.

Food In Monsoon
Food In Monsoon

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews