Funny Video: “तू ये साजना…” आजीबाईंनी गुडघ्यावर बसून आजोबांना दिलं भन्नाट प्रपोज; व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल
Funny Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका आजीबाईंनी आपल्या पतीला, म्हणजेच आजोबांना, वयाच्या या टप्प्यावर देखील अगदी रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं आहे. या व्हिडिओने लोकांचे मन जिंकले आहे आणि पाहणारे अक्षरशः पोट धरून हसत आहेत.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे प्रसिद्ध शब्द आठवतात, “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.” प्रेम ही अशी भावना आहे ज्यावर काळाचा कोणताही परिणाम होत नाही. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना प्रेम व्यक्त करण्याचा हक्क आहे, याचेच उदाहरण हा व्हायरल व्हिडिओ देतो. यात एका वृद्ध कपलने एकमेकांसमोर आपली प्रेमभावना व्यक्त करताना दिसत आहे.
प्रेम व्यक्त करण्याचं अनोखं क्षण
आजच्या काळात अनेकजण समाजाच्या समोर खुलेआम आपल्या प्रेमाची कबुली देतात, प्रपोज करतात. मात्र, एकेकाळी प्रेम व्यक्त करायला लोकं संकोचत होते. आता मात्र हे दृश्य बदललं आहे, आणि प्रत्येक वयोगटातील लोकं आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, एका आजीबाईंना त्यांच्या नातवाने आजोबांना प्रपोज कसं करायचं हे शिकवलं, आणि आजींनीही गुडघ्यावर बसून आजोबांना “आय लव्ह यू” असं म्हणत प्रपोज केलं. आजींच्या या कृतीनं आजोबाही काही कमी नाहीत, त्यांनीही लगेच माईक हातात घेत, “आय लव्ह यू” असं म्हणत आजींना प्रपोज केलं. या क्षणाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं.
प्रेमाला वयाची मर्यादा नाही
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. @actor_om_yadav_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला “प्रेमाला वय नसतं” असं कॅप्शन दिलं आहे. जुन्या काळातील प्रेमाची एक वेगळीच गोडी असते, जिथे शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. डिजिटल युगातील नात्यांच्या दुनियेतही, जुनं प्रेम आजच्या तरुणांना प्रेरणा देतं.
नव्या पिढीसाठी एक प्रेरणा
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की प्रेम व्यक्त करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. प्रेम हे कोणत्याही वयात आणि कोणत्याही परिस्थितीत उफाळून येऊ शकतं. आजी-आजोबांचे हे प्रेम आजच्या पिढीसाठीही एक प्रेरणा ठरत आहे.
तर तुम्हीही हा व्हिडिओ पाहून या सुंदर क्षणाचा आनंद घ्या आणि प्रेमाच्या या निरागस भावनेला सलाम करा!
पाहा हा व्हिडिओ :
View this post on Instagram