Ganesh Visrjan: विसर्जनाच्या गोंधळात 4 लाखांची सोनसाखळी हरवली, तब्बल 10 तासांनी पुन्हा मिळाली!
Ganesh Visrjan:गणेशोत्सवाच्या उत्साहात विसर्जनात अनपेक्षित घटना
गणेशोत्सवाच्या उत्साहात एका जोडप्याच्या विसर्जनात Ganesh Visrjan अनपेक्षित घटना घडली. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये रामय्या आणि उमादेवी या जोडप्याने दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन Ganesh Visrjan करताना गणपतीच्या मूर्तीवर घातलेली खऱ्या सोन्याची साखळी विसरली. या सोनसाखळीची किंमत तब्बल 4 लाख रुपये होती. घरी परतल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं आणि लगेचच त्यांनी त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी कृत्रिम तळ्याकडे धाव घेतली.
आणखी पाहा : Narendra Modi And Rahul Gandhi Wealth: मोदी आणि राहुलची श्रीमंती: बघा कोण आहे अधिक धनवान
सोनसाखळी विसर्जित झाल्याचं कसं लक्षात आलं?
विजयनगरमधील दहशरहाली सर्कलजवळ हा प्रकार घडला. गणेश मूर्तीचं विसर्जन Ganesh Visrjan झाल्यानंतर रामय्या आणि उमादेवी यांनी घरी पोहोचताच त्यांच्या लक्षात आलं की, गणपतीच्या गळ्यातील खऱ्या सोन्याची साखळी काढायची राहिली आहे. त्याचवेळी त्यांची घाबरगुंडी उडाली आणि ते तातडीने विसर्जन Ganesh Visrjan स्थळाकडे गेले. मात्र, तळ्याकडे कार्यरत असलेल्या एका मुलाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती, पण ती नकली असेल असे मानून त्याने ती विसर्जित केली होती.
संपूर्ण तलाव उपसण्यापर्यंतची धावपळ
सोनसाखळी हरवल्याचे कळताच स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनाही याबाबत कळवण्यात आलं. त्यांनी तातडीने मदतीला 10 जण पाठवले. तब्बल 10 तास चाललेल्या शोध मोहिमेत 10,000 लिटर पाणी उपसण्यात आलं, तसेच 300 गणेश मूर्तींचं विसर्जन Ganesh Visrjan केलेल्या तलावातील गाळही शोधण्यात आला.
आखेर साखळी सापडली
सकाळी दुसऱ्या दिवशी हा शोध यशस्वी ठरला. स्थानिक तरुणाच्या मदतीने अखेर सोनसाखळी सापडली आणि रामय्या व उमादेवी यांच्या जीवात जीव आला. या घटनेनंतर गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला.