Gold Rate
Sone Chandi Che Bhav(Gold Silver Price Today): सोन्याच्या खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी 40 दिवसानंतर सोन्याच्या बाजारभावात चांगल्या प्रमाणात घट झाली आहे यामुळे ग्राहकात आनंदाचे वातावरण आहे. भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 2 जुलै 2024 रोजी सकाळी सोने स्वस्त झाले आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा भाव ७१,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. तर, चांदीचा भावही ८६ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, गुरुवारी संध्याकाळी 24 कॅरेटचे शुद्ध सोने 71,115 रुपये प्रति 10 ग्रॅम होते त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने स्वस्त तसेच चांदी देखील स्वस्त झाली आहे.
ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे सोन्याच्या भावात सुमारे 40 दिवसांत 3400 रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीही या महिनाभरात जवळपास १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
22 कॅरेट Gold Rate Today
Gold Silver Price Today: अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, आज 995 शुद्धतेचे सोने 71,965 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, 916 (22 कॅरेट) प्योरिटी असलेले सोने 66,185 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) प्योरिटी असलेले सोने 54,191 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 585 (14 कॅरेट) प्योरिटी असलेल्या सोन्याची किंमत 42,269 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Rate सोने-चांदीचे आजचे भाव
शुद्धता | रविवार संध्याकाळचा दर (प्रति 10 ग्रॅम) | सोमवार सकाळचा दर (प्रति 10 ग्रॅम) | |
---|---|---|---|
999 (24 कॅरेट) | 71,770 रुपये | 70,254 रुपये | |
995 (22 कॅरेट) | 70,826 रुपये | 69,965 रुपये | |
916 (22 कॅरेट) | 66,057 रुपये | 66,185 रुपये | |
750 (18 कॅरेट) | 54,086 रुपये | 54,191 रुपये | |
585 (14 कॅरेट) | 42,187 रुपये | 42,269 रुपये | |
999 (चांदी) | 92,673 रुपये | 91,793 रुपये |
मेकिंग चार्ज आणि कर
Sone Chandi Che Bhav: इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून जारी करण्यात आलेल्या किमतींमध्ये कर आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नसतात. दागिने खरेदी करताना सोने किंवा चांदीच्या दरात कर आणि मेकिंग चार्ज समाविष्ट केल्यामुळे किमती वाढतात.
आणखी पाहा : Vegetable Rate: गृहिणींच्या किचन बजेटला मोठा धक्का: लिंबू ८ रुपयांना, तर इतर भाजीपाला पण महागला
१ जुलै रोजी भारतीय सराफा बाजार सोन्याचा भाव २०७ रुपयांनी घसरला आणि 71,375 रुपयांवर आला. सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून 3400 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत स्वस्त झाला आहे. आकडेवारीनुसार, २० मे रोजी सोन्याचा भाव 74,700 रुपयांवर पोहोचला होता.
दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. सोमवारी भारतीय सराफा बाजारात चांदीची किंमत 86,700 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली. चांदीची किंमत गेल्या महिन्याभरात 96,500 रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे.