Gold-Silver Rate: सोनं ८० हजार पार, चांदी लाखात , पाहा नेमकी काय आहेत भाव ?
दिवाळीपूर्वी सोनं झालं ऐंशीपार, चांदी लाखोंच्या घरात
सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशांतर्गत वाढती मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील उलाढालींच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीचे दर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. आज (२४ ऑक्टोबर) सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून आली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर ऐंशी हजारांच्या पुढे गेले आहेत.
आणखी पाहा : महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन || Jio Recharge Plan
सोनं ८० हजार पार, चांदी लाखात
२४ कॅरेट सोन्याचा दर आज ८०२५.३ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचा दर ७३५८.३ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत असून आज चांदीचा दर १,०७,२०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मुंबईमध्ये सोन्या-चांदीचे दर
मुंबईमध्ये आज सोन्याचा दर ८०१०७ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला आहे, जो कालच्या ७९६७७ रुपयांच्या तुलनेत वाढलेला आहे. एका आठवड्यापूर्वी, सोन्याचा दर ७८१४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज चांदीचा दर १,०६,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, जो काल १,०३,५०० रुपये होता. आठवड्यापूर्वी हा दर ९९३०० रुपये होता.