Gold-silver rate : पोळ्याच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचे नवे दर
Gold-silver rate: सोने-चांदीचे दर काय आहेत?
आज पोळ्याच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. गेल्या महिन्यात या धातूंच्या किमतीत अस्थिरता पाहायला मिळाली होती. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये Gold-silver rate सातत्याने चढ-उतार दिसून आले. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आजचे नवे दर
बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,८८१ रुपये आहे, तर २४ कॅरेटसाठी ती ७१,८७० रुपये आहे. चांदीची किंमत प्रति १० ग्रॅम ८५१ रुपये असून प्रति किलो चांदीचा दर ८५,०९० रुपये आहे. Gold-silver rate
आणखी पाहा : ऐन सणाच्या दिवशी सिलेंडरचे दर महागले जाणून घ्या नवीन दर..
शहरानुसार सोन्याचे दर
मुंबई, पुणे, नागपूर, आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७६२ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे. यातील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस, आणि इतर करांचा समावेश नसल्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना त्यांच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
२२ कॅरेट आणि २४ कॅरेटमध्ये फरक
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते, तर २२ कॅरेट सोन्यात अंदाजे ९१% शुद्धता असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, आणि जस्त यांसारख्या धातूंचा समावेश करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे कठीण असल्याने, २२ कॅरेट सोनेच दागिन्यांसाठी अधिक पसंत केले जाते.
हॉलमार्कचे महत्त्व
सोने खरेदी करताना हॉलमार्क तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हॉलमार्कमुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. १ एप्रिल २०२३ पासून, भारत सरकारने हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने विकण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करावेत.