व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सोने खरेदी करायचा विचार करताय? दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीचे भाव घसरले, पाहा आजचे सोने-चांदी दर || Gold Silver Rate Today

By Rohit K

Published on:

Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today:सोने खरेदी करायचा विचार करताय? दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीचे भाव घसरले, पाहा आजचे सोने-चांदी दर

Gold Silver Rate Today: नवरात्रीदरम्यान सोने चांदीच्या दरात अनेकदा चढउतार दिसून आला. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दरात चांगलीच वाढ दिसून आली होती पण आता दसऱ्यानंतर सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही दिवाळीमध्ये सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आजच्या दरामध्ये सोन्याचे दागिने बुक करू शकता. दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे पण येत्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.

 आणखी पाहा : 12 महिने, 5000 रुपये प्रति महिना: PM इंटर्नशिप योजनेच्या संधी जरा उजळा! || Pm Internship Yojana

सोने चांदीचे दर (Gold Silver Rate)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,६३९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,९७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलो विकली जात आहे. रविवारी चांदीचा दर ९०,३०० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,१९० रुपये होता.

शहरानुसार सोन्याचे दर:

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ६९,४६५ रुपये ७५,७८० रुपये
पुणे ६९,५०२ रुपये ७५,८२० रुपये
नागपूर ६९,५०२ रुपये ७५,८२० रुपये
नाशिक ६९,५०२ रुपये ७५,८२० रुपये
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews