व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

नवरदेवाचा भन्नाट डान्स! हळदीत नवरदेवाची धूम, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “काहीतरीच…! Groom Dances Viral Video

By Rohit K

Published on:

Groom Dances Viral Video

Groom Dances Viral Video: नवरदेवाचा भन्नाट डान्स! हळदीत नवरदेवाची धूम, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “काहीतरीच…!

Groom Dances Viral Video:नवरदेवाने जोशात केलेला भन्नाट डान्स 

हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने जोशात केलेला भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हळदीने माखलेल्या नवरदेवाने हळदी गाजवत ठेका धरताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक खास आणि संस्मरणीय क्षण असतो. या दिवशी दोन व्यक्तींशीच नव्हे तर दोन कुटुंबांशीही बंध निर्माण होतो. म्हणूनच प्रत्येकजण आपलं लग्न खास आणि अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतो. भारतात लग्नसंस्था अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे साखरपुडा, हळद, आणि मुख्य लग्न सोहळा धूमधडाक्यात साजरे होतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आणखी पाहा :बसमध्ये महिलांच्या भांडणात तरुणाचा बळी; व्हिडीओ व्हायरल || Viral Video 

गावाकडच्या लग्नांचे वेगळेपण असते. प्रत्येक गावातील प्रथा, रीतीरिवाज आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. या प्रथांनुसार लग्नसोहळ्याचे कार्यक्रम पार पडतात. सोशल मीडियावर अशा गावाकडच्या लग्नांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड गाजत आहे, ज्यामध्ये नवरदेव त्याच्या हळदीत एकदम हटके डान्स करताना दिसतोय.

सर्वत्र चर्चेत असलेला व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव त्याची हळद मनमुरादपणे एन्जॉय करताना दिसतोय. पांढरा सदरा लेंगा, डोक्यावर बाशिंग आणि हळदीने माखलेला हा नवरदेव स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतो. त्याच्या जोशात इतर पुरुष मंडळीही सामील होत त्याच्यासोबत ठेका धरत आहेत.

हा व्हिडीओ @viralinmaharashtra या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “असा डान्स करायचा असेल तरच माझ्या लग्नात या” असं मजेशीर कॅप्शन देण्यात आलंय. या व्हिडीओला सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “काहीही असो, पण बघायला मस्त वाटतंय.” दुसऱ्याने कमेंट केली, “अरे, ते तोंडातलं पान थुंकून ये!” तर एका युजरने नवरदेवाच्या नृत्याचा उल्लेख करत म्हटलं, “हा डान्स आदिवासी भागातील पारंपारिक नृत्य आहे, अप्रतिम!”

पाहा हा व्हिडीओ : 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews