Hardik Pandya and Natasha Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविचच्या वैवाहिक आयुष्यात तणाव, घटस्फोटाच्या चर्चा जोरात
Hardik Pandya and Natasha Divorce:क्रिकेट विश्वातील चर्चित खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविच यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या हार्दिक पांड्या, जो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे, त्याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे.
हार्दिक आणि नताशाच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला असून, दोघेही विभक्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे दोघे 2020 मध्ये कोर्ट मॅरेज करून विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
14 फेब्रुवारी 2023 रोजी उदयपुरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी भव्यदिव्य लग्न केले. या लग्नसोहळ्यात त्यांनी थेट लिपलॉक करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाल्यानंतर, त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसारही विवाह केला. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
सध्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या विषयावर हार्दिक आणि नताशाने अजून कोणतेही भाष्य केले नाही. त्यांच्या वैवाहिक जीवनातील हा तणाव खरोखरच विभक्त होण्यापर्यंत जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
क्रिकेट चाहत्यांसाठी हार्दिकच्या या खासगी आयुष्याच्या बातम्या धक्का देणाऱ्या आहेत, आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कसा मिटवता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.
आणखी हे वाचा: Hardik Pandya-Natasha Divorce: खासगी आयुष्यातील वादळामुळे आयपीएल संघ बदलण्याची वेळ..