व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कंपनीच्या गेटजवळ तरुणावर काळाचा घात; कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल || Accident viral video

By Rohit K

Published on:

Accident viral video: कंपनीच्या गेटजवळ तरुणावर काळाचा घात; कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Accident viral video: हिट अँड रनची घटना; सोशल मीडियावर व्हिडीओने उडवला धुमाकूळ

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांत देशभरात हिट अँड रन प्रकरणांची वाढती संख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे. अशाच एका भयानक अपघाताची घटना कोल्हापूरमध्ये घडली असून, या घटनेचा व्हिडीओ Accident viral video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मन सुन्न करणारा असून, तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.

आणखी पाहा : ज्वेलर्सच्या दुकानात दिवसा धाडसी चोरी,मिनिटांमध्ये लुटलं कोटींचं सोनं,VIDEO पाहून बसेल धक्का || Heist viral video

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कामावर जात असताना भरधाव कारने दिली धडक 

कोल्हापूरमधील उचगाव रोडवर घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर रात्रीच्या वेळी एका तरुणावर काळाने घाला घातला. कंपनीत कामावर जात असताना, गेटजवळ पोहोचताच एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने या तरुणाला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तरुण थेट हवेत उडाला आणि काही क्षणांतच त्याचा भयंकर अपघात झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली घटना

हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. गांधीनगर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील तरुणाच्या प्रकृतीविषयी मात्र अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

Accident viral video सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

दररोज सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. @Diwakar_singh31 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला लोकांनी मोठ्या प्रमाणात पाहिले असून, तो जोरदार व्हायरल झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पाहा हा व्हिडीओ:

Accident viral video
Accident viral video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews