व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

धडकी भरवणारा हॉरर शो! तरुणी लागली रडायला; पुढे जे घडल….धडकी भरवणारा व्हिडीओ || Horror-show Viral Video

By Rohit K

Published on:

Horror-show Viral Video

Horror-show Viral Video: धडकी भरवणारा हॉरर शो! तरुणी लागली रडायला; पुढे जे घडल….धडकी भरवणारा व्हिडीओ

गणेशोत्सवात भलताच हटके कार्यक्रम, भाविकांसाठी हॉरर शोचं आयोजन

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा Horror-show Viral Video व्हिडीओ कर्नाटकातील निपाणी येथील कुंभार गल्लीच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचा आहे. या मंडळाने भाविकांसाठी खास ‘हॉरर शो’ आयोजित केला होता, ज्यामध्ये लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळेच धडकी भरायला लावणाऱ्या भयानक दृश्यांनी घाबरून गेले. हा अनोखा शो पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

आणखी पाहा : बसमध्ये महिलांच्या भांडणात तरुणाचा बळी; व्हिडीओ व्हायरल || Viral Video

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

भीतीदायक शोमध्ये भाविकांचा उत्साह, तर काहींनी गमावलं धैर्य

व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, शो पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती. गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांपेक्षा या हॉरर शोसाठी जास्त उत्सुकता दिसून येत होती. आत प्रवेश करताच, समोरून भयानक मुखवटे घातलेला भूतांच्या पोशाखातील माणूस समोर येतो. आजूबाजूला काळोख, सांगाडे, वेली आणि भितीदायक आवाजांनी शोचं वातावरण तयार करण्यात आलं होतं.

हॉरर शो पाहून अनेक लोक घाबरले, तर काही जण भीतीमुळे चक्क रडायलादेखील लागले. एक मुलगी तर रडून थरथर कापू लागली आणि तिचे आई-वडील तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. हा व्हिडीओ पाहून हा शो किती भयानक होता, याची प्रचिती येते.

व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कुंभार गल्लीच्या या हटके शोचा व्हिडीओ @kumbhar_galli_nippan या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा शो पाहून आपले अनुभव शेअर केले आहेत.

काही युजर्सनी टीका करत म्हटलं, “अरे कोणाला अटॅक येईल असं काही करू नका,” तर काहींनी हा शो मनोरंजक असल्याचं सांगितलं. एका आईने कमेंट करत लिहिलं, “माझी मुलगी स्वरा तर घाबरून बोलली की ती आयुष्यात पुन्हा असं काही पाहायला जाणार नाही. ती खूपच घाबरली होती.”

असा हा शो जरी गणेशोत्सवाच्या पारंपारिक कार्यक्रमांपेक्षा वेगळा असला, तरी त्याने अनेक भाविकांची मनं भेदली आहेत.

पाहा हा व्हिडीओ: 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews