व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Jitendra Avhad Viral News: जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत मोठी वाढ, दोन गुन्हे दाखल; उद्या भाजप, रिपाइंचं आंदोलन

By Rohit K

Published on:

Jitendra Avhad Viral News: जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत मोठी वाढ, दोन गुन्हे दाखल; उद्या भाजप, रिपाइंचं आंदोलन

 

Jitendra Avhad Viral News:शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या महाडमधील आंदोलनामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. मनुस्मृती दहन करत असताना, अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडल्यामुळे आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

मनुस्मृती दहनाचे कारण

अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याच्या विरोधात आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचं आंदोलन आयोजित केलं होतं. या आंदोलनादरम्यान, त्यांनी चुकून आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं. हे प्रकरण अनावधानाने झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, तरीही भाजपने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

दोन गुन्हे दाखल

पहिला गुन्हा पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. भाजपच्या तक्रारीनुसार, डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप आहे. दुसरा गुन्हा रायगडमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि 22 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजपचा आक्रमक पवित्रा

आव्हाड यांच्या या कृतीमुळे भाजपने उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदिवली, सीएसटी, दादरसह राज्यातील विविध भागात भाजपचे कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजता आंदोलन सुरू करणार आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंही या आंदोलनात सहभागी होणार आहे.

पाहा हा व्हिडियो:

आव्हाड यांची स्पष्टीकरण

आव्हाड यांनी सांगितलं की, आंबेडकर यांचा फोटो फाडणं हे अनवधानाने झालं असून, त्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, भाजपने हे प्रकरण लावून धरलं असून, त्याविरुद्ध आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

आव्हाड यांच्या विरोधातील हे आंदोलन आणि गुन्हे दाखल होण्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांच्यावरच्या आरोपांवर न्यायालय काय निर्णय देतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आणखी पाहा:Sharad Pawar Joined BJP? शरद पवारांचा धक्कादायक खुलासा: सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 || महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक || दिवाळी आधी की नंतर? जाणून घ्या

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews