व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

“जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या..”|| Kalicharan Maharaj Viral Speech

By Rohit K

Published on:

“जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या..” :कालीचरण महाराज नाशिकमध्ये: वादग्रस्त वक्तव्य || Kalicharan Maharaj Viral Speech

 

Kalicharan Maharaj Viral Speech,Nashik news: नाशिकच्या भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली.

 

वादग्रस्त वक्तव्ये

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कालीचरण महाराजांनी आपल्या भाषणात प्रचंड वादग्रस्त विधान केले. “जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही,” असे ते म्हणाले.

 सामाजिक आणि धार्मिक मुद्दे

 

कालीचरण महाराजांनी धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. “माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहे. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे, पिणे, झोपने, सेक्स करणे हे लक्षण पशूंमध्ये असतात. भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद, लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे,” असे त्यांनी जोरदारपणे मांडले.

 गुरूंची प्रेरणा

कालीचरण महाराजांनी त्यांच्या गुरूंची महत्ता सांगितली. “महामुनी अगस्त्य ऋषी माझे गुरू आहेत. माझ्या रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्ह मुहूर्तावर प्रगट झाले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही आता सावरले नाहीत तर मारणार आहे. पण पिंडदानसाठी कोणीही उरणार नाही,” असे ते म्हणाले.

धर्माची महत्ता

धर्म आणि अध्यात्म यावर देखील कालीचरण महाराजांनी आपले विचार व्यक्त केले. “धर्म म्हणजे काय? ज्याची धर्माप्रती निष्ठा नसते तो लोट्यासारखा नसतो. मधमाशीची प्रवृत्ती त्यांना सगळे घराबाहेर काढतात. अध्यात्म शब्दाचा काय अर्थ? ईश्वराच्या बाबतीत. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

 

सनातन हिंदू धर्म

कालीचरण महाराजांनी सनातन हिंदू धर्माच्या सहा भागांची चर्चा केली. “अनंत कोटी ब्रम्हांडमध्ये एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. याचे सहा भाग आहेत: शैव, वैष्णव, शक्ती उपासक, जैन, शीख. ईश्वर उद्दीष्ट्य असलं पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

कालीचरण महाराजांचे हे वादग्रस्त वक्तव्य विविध वर्तुळात चर्चा आणि विवादांना कारणीभूत ठरले आहे. त्यांच्या विचारांबद्दल मतमतांतर असू शकते, परंतु त्यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक आणि सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

आणखी पाहा: PM Modi Speech 2024: मी जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत मुस्लिमांना बघा काय म्हणाले मोदी त्यांच्या भाषणात

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews