व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kiran Gaikwad Story: अरेंज मॅरेजमध्ये मुलीने केली फसवणूक, लग्न मोडल्याने नैराश्यात गेलेला किरण गायकवाड, म्हणतो- तिचं लग्न झालं पण मी..

By Rohit K

Published on:

Kiran Gaikwad Story

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने केली फसवणूक, लग्न मोडल्याने नैराश्यात गेलेला किरण गायकवाड, म्हणतो- तिचं लग्न झालं पण मी..

Kiran Gaikwad Story: लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाड याने ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरात स्थान मिळवलं. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर किरण काही चित्रपटात झळकला. त्याच्या ‘चौक’ या चित्रपटातील भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. सध्या तो ‘डंका’ या चित्रपटात झळकत आहे, जो नुकताच प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत किरणने त्याच्या आयुष्यातील एक खळबळजनक घटना सांगितली, ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. एका मुलीने अरेंज मॅरेजमध्ये त्याची फसवणूक केली होती आणि त्याचं लग्न अवघ्या सहा महिन्यात मोडलं होतं. Kiran Gaikwad Story

🖇️आणखी पाहा: Viral: लढाई हारली आणि लग्नाची मागणी फेटाळली: MMA फायटर लुकास बुकोवाझचा दुहेरी धक्का 

किरणने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत Kiran Gaikwad Story चा खुलासा केला. तो म्हणाला, “माझं लग्न ठरलं होतं. ते अरेंज मॅरेज होतं आणि मी यानंतर काय करायचं हे नेमकं ठरवलं होतं. जशी सगळे स्वप्न बघतात तशी मी पण बघितली होती. हे माझं घर असेल, इथे आमच्या नवरा-बायकोची फ्रेम असेल अशा या सर्व माझ्या गोष्टी ठरल्या होत्या. लग्न ठरल्यापासून सहा महिन्यांचं आमचं नातं होतं. त्यामध्ये आम्ही दोन-तीन वेळा भेटलोही.” Kiran Gaikwad Story

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या अनुभवाबद्दल बोलताना किरण भावुक होतो. तो म्हणाला, “अशातच मला एका व्यक्तीचा मेसेज आला. माझ्यासोबत डबल डेटिंगचा प्रकार घडला होता. त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. त्यावेळी माझ्या गोळ्याही सुरू झाल्या. ही गोष्ट अगदी अलिकडेच ‘चौक’ सिनेमाचं शुटिंग सुरू होतं तेव्हा झालेली. सुदैवाने काम सुरू असल्यामुळे मी त्या नैराश्यातून बाहेर येऊ शकलो. आता त्या मुलीचं लग्नही झालं आहे आणि मी ठरवलं की आता बास किती दिवस त्या आठवणीत आणि दुःखात राहणार. मग शेवटी मी यातून बाहेर पडलो.” Kiran Gaikwad Story

Kiran Gaikwad Story
Thanks to eSakaal

किरण गायकवाडच्या या अनुभवाने त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे. त्याच्या प्रामाणिकपणाने आणि धाडसाने त्याने आपल्या आयुष्याची ही कडू घटना जगासमोर मांडली आहे. आशा करुयात की किरण त्याच्या भावी आयुष्यात अधिक यशस्वी होईल आणि या दु:खातून संपूर्णपणे बाहेर पडेल. Kiran Gaikwad Story

🖇️ आणखी पाहा: Love Story End: प्रेमाचा शेवट : 6 वर्षांच्या प्रेमसंबंधांचा ट्रॅजिक अंत

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews