व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 3000 रुपये आल्यावर सासू-सुनेने केली कमाल, व्हिडिओ व्हायरल || Ladaki bahin viral video

By Rohit K

Published on:

Ladaki bahin viral video: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 3000 रुपये आल्यावर सासू-सुनेने केली कमाल, व्हिडिओ व्हायरल

Ladaki bahin viral video: ‘सूनबाईचे ३,००० रुपये आले’ म्हणत सासू-सुनेचा जल्लोष

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात सासू आणि सुनेने एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओची खासियत म्हणजे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सूनबाईच्या खात्यात आलेल्या ३,००० रुपयांवर त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. ‘सूनबाई चल पार्टी करू’ या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी पाहा : आई ही आई असते! बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई करतेय लोकांजवळ विनवणी,पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ || Viral Video

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Ladaki bahin viral video: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांमध्ये आनंदोत्सव

राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अमलात आणलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे. अशा पार्श्वभूमीवर सासू-सुनेने केलेला डान्सचा व्हिडिओ Ladaki bahin viral video हा त्या आनंदाचा एक छोटासा भाग आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल व्हिडिओने नेटिझन्स केले फिदा Ladaki bahin viral video

सासू-सुनेच्या या धमाल डान्सने नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. @nakti_family0803 या अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला ६९,००० पेक्षा जास्त व्ह्युज आणि १६०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. युजर्सनीही या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ‘आजी एक नंबर’ अशी कमेंट केली, तर इतरांनी इमोजींचा वापर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

सासू-सुनेच्या नात्यातील नवा रंग 

सासू-सुनेच्या नात्यातील हा सकारात्मक आणि आनंदी रंग या व्हिडिओमधून समोर आला आहे. सोशल मीडियावर दररोज हजारोंच्या संख्येने व्हिडिओ व्हायरल होत असले तरी, सासू-सुनेच्या या जुगलबंदीने विशेष चर्चेत येत आपलं स्थान पक्क केलं आहे.

पाहा हा व्हिडिओ: 

Ladaki bahin viral video
Ladaki bahin viral video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews