Ladki lek Yojana
निव्वळ लाडक्या बहिणी योजनेचा फायदाच नाही तर दुसऱ्या मोठमोठ्या योजनेचाही फायदा घेत चला.
तुम्हाला माहित आहे का लाडक्या लेकीला लाडक्या बहिणीपेक्षा कितीतरी पट अधिक पैसे मिळतात.
तर मग या योजनेचा कसा फायदा घ्यायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
या अगोदर आपण जाणून घेणार आहोत लाडकी लेक योजना काय आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मुलीचा राज्यात जन्मदर वाढवा आणि मुलीला संगोपनासाठी एक आई-वडिलाला मदत म्हणून एक मोठी रक्कम दिली जाते.
मुलींना तब्बल 75 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते हे तुम्हाला माहित आहे का नुसते लाडक्या बहिणीच्या मागे लागून या योजनेचा फायदा घ्यायचा विसरू नका..
योजनेचे उद्दिष्टे
राज्यात मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलगी जन्मल्यानंतर त्या मुलीला उच्चशिक्षित करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून, उच्चशिक्षित मुलींमुळे बालविवाह प्रथा कमी करणे, मुलींना सुशिक्षित बनवण्यासाठी.
तर मग कसे मिळतात या योजनेद्वारे पैसे
पिवळे व केशरी राशन कार्ड धारकाच्या घरात मुली जन्मल्याबरोबर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सातवीत 7 हजार रुपये, अकरावीत 8
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हजार रुपये, तर मुलीचे वय 18 झाल्यानंतर 75 हजार रुपये अशाप्रकारे एकूण रक्कम 101000 देण्यात येते.
योजनेच्या अटी व नियम
1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आलेली असावी यानंतर एक किंवा दोन मुली असाव्यात . तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास ती फक्त मुलीलाच लागू राहील.
दुसऱ्या व तिसऱ्या त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे व कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असू नये.
तर मग योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
आवश्यक कागदपत्र
- मुलीचा जन्म प्रमाणपत्र
- मुलीचे आधार कार्ड पाच दुसरे हप्त्यावेळी
- वडीलाचे आधार कार्ड
- कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाखापेक्षा अधिक असू नये
- रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- मुलगी शिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र
- कुटुंबाची शस्त्रक्रिया झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- शेवटचा म्हणजे 75 हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 कम्प्लीट व मुलीचे लग्न झालेले असू नये.